![]()
राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात वाढ, तर कमाल तापमानात घसरण झाली होती. मात्र, शनिवारी राज्यात आकाश स्वच्छ व निरभ्र झाल्याने आगामी तीन दिवस वातावरणात गारवा राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवातामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांत ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा हिमवर्षाव होत आहे. तो आगामी ७२ तास सुरू राहिल. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच महाराष्ट्रात आर्द्रता कमी होऊन वातावरण कोरडे झाल्याने पहाटेच्या गारठ्यात वाढ झाली, तसेच दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. प्रमुख शहरांतील तापमान नाशिक१२.५
गोंदिया१२.६
मालेगाव१३.२
पुणे१३.६
संभाजीनगर१५.४
सोलापूर१७.६
जळगाव – १९.०
अहिल्यानगर१४.०
(किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
जम्मू-हिमाचलमधील हिमवर्षावामुळे राज्यात पुन्हा 3 दिवस थंडी परतणार:हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळेंनी वर्तवला अंदाज
