Devendra Fadnavis Confirms Mahayuti Amravati BMC Election Alliance | अमरावती मनपा निवडणूक महायुती म्हणूनच लढणार: जागा वाटप अंतिम टप्प्यात, लवकरच निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – Amravati News



राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल असे स्पष्ट केले आहे. जागा वाटपाबाबत स्थानिक नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच याबाबत निर्णय जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्य

.

फडणवीस शनिवारी अमरावतीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे दिला जाणारा डॉ. भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गेल्या चार दिवसांत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यात अमरावती आणि नागपूर येथे चार बैठका झाल्या होत्या. मात्र, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने युतीबाबत अंतिम निर्णय झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर अमरावती मनपात युती होणार की नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ठरल्याप्रमाणे महायुती होणार आहे. लवकरच कोणता पक्ष किती जागा लढणार हे स्पष्ट होईल. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र ‘एकला चलो रे’ धोरण स्वीकारले असून, त्यांनी युतीत सहभागी न होण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यामुळे अमरावती मनपा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखालील युवा स्वाभिमान पार्टी महायुती करून लढणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *