Devendra Fadnavis Receives Bhausaheb Deshmukh Smriti Puraskar Amravati | देवेंद्र फडणवीसांना भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान: हा पुरस्कार इतर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपेक्षा अधिक मोलाचा; मुख्यमंत्र्यांचे मत – Amravati News
![]()
परम महासंगणाचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर व श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते भाऊसाहेब स्मृती पुरस्कार स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी अमरावती येथे ‘भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार इतर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपेक्षा अधिक मोलाचा असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. या पुरस्का
.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंती सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. परम महासंगणकाचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य प्राचार्य अशोक उईके आणि डॉ. पंकज भोयर, खासदार बळवंतराव वानखडे आणि डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभाताई खोडके, परिणय फुके, संजय कुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेचे आभार मानत सांगितले की, देश-विदेशात अनेक पुरस्कार मिळाले असले तरी, हा पुरस्कार त्यांना नवी ऊर्जा देणारा आहे. भारताचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री, लोकमहर्षी आणि शिक्षणमहर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाने हा पुरस्कार असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे.
शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी भाऊसाहेब देशमुख यांनी सावकारी कर्जाविरोधात पहिला कायदा केला होता. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक कायदेशीर चौकट निर्माण केली होती, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या पुरस्कारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची निवड का करण्यात आली, याचा उल्लेख मानपत्रात करण्यात आला होता. समृद्धी महामार्ग, नळगंगा-वैनगंगा नदी जोड प्रकल्प, रखडलेल्या धरणांच्या कामांना गती, शेतीला मदतीचे धोरण, मेट्रो ट्रेन, उद्योग-व्यवसायाच्या वाढीसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबतचे करार, प्रशासकीय सुधारणा आणि पायाभूत सुविधांवर भर यांसारख्या अनेक निर्णयांद्वारे राज्याला प्रगतीपथावर नेण्यात त्यांना यश मिळाल्याचे मानपत्रात म्हटले आहे.
या मानपत्राचे वाचन संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे ज्येष्ठ सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले.
