MIM Announces First Candidate List Aurangabad Jalna Nashik Municipal Elections | महायुती-मविआच्या चर्चेत एमआयएमची बाजी: महापालिकेसाठीची पहिली यादी जाहीर, छत्रपती संभाजीनगरसाठी 8 नावांची घोषणा – Chhatrapati Sambhajinagar News


राज्यात महापालिका निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे चर्चाचक्र सुरू असतानाच, एमआयएमने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि न

.

इम्तियाज जलील यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत छत्रपती संभाजीनगरमधील विविध प्रभागांतील 8 उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय जालन्यातील 1 आणि नाशिकमधील 3 उमेदवारांची नावेही घोषित करण्यात आली आहेत. इतर मोठ्या पक्षांची युती आणि जागावाटपाची गणिते अद्याप सुटलेली नसताना एमआयएमने घेतलेली ही झेप आगामी निवडणुकीत चुरस वाढवणारी ठरणार आहे.

गेल्या महापालिकेत एमआयएमचे 26 नगरसेवक निवडून आले होते आणि पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे बजावली होती. यावेळी ही संख्या 30 ते 35 पर्यंत नेण्याचा आमचा निर्धार आहे, असा विश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. निवडणुकीसाठी पक्षाकडे 400 हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून, एका एका प्रभागात 7 ते 8 इच्छुक उमेदवार असल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण असल्याचा दावाही त्यांनी एका मुलाखतीत केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *