Lavani festival during Malegaon Yatra; Audience mesmerized by the beat of the drums | माळेगाव यात्रेमध्ये लावणी महोत्सव: ढोलकीच्या तालावर रसिक मंत्रमुग्ध – Ahilyanagar News



दक्षिण भारतातील प्रसिद्ध अशा माळेगाव यात्रेनिमित्त महाराष्ट्राची अस्सल लोककला असलेल्या लावणीचा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. श्री खंडोबारायांच्या यात्रेतील या लावणी महोत्सवात अबालवृद्धांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. “लाखात देखणी, आपली लावणी” म्हणत रसि

.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत सहा तमाशा फडांची उपस्थिती होती. यामध्ये तमाशा सम्राट रघुवीर खेडकर, मंदा राणी खेडकर, शिवकन्या बडे आणि रूपाली पुणेकर यांच्या संचांनी दर्जेदार कला सादर केली. ‘जरा सरकून बसा की नीट’ अशा लोकप्रिय लावणी गीतांवर पुणे येथील कलाकारांनी असा काही ठेका धरला की संपूर्ण माळेगाव परिसर लोककलेच्या रंगात न्हाऊन निघाला. लावणी, सवाल-जवाब विनोदी प्रहसनांनी रसिकांची वाहवा मिळवली.

सांस्कृतिक वारसा आणि कलाकारांच्या व्यथा “माळेगाव यात्रेतील लावणी महोत्सवाने सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवले असले, तरी कलाकारांच्या डोळ्यांतील अश्रू लपून राहिले नाहीत. दिवसेंदिवस खालावत चाललेली आर्थिक स्थिती आणि वाढती महागाई यामुळे तमाशा कलावंत संकटात आहेत. ‘आम्ही रसिकांचे मनोरंजन करतो, पण आमचे भविष्य काय?’ असा सवाल उपस्थित करत कलाकारांनी मानधन वाढीची मागणी केली आहे. या थोर लोककलेला राजाश्रय मिळावा, अशी भावना यानिमित्ताने व्यक्त झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *