![]()
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत उमेदवारांच्या नावांच्या अद्याक्षराप्रमाणे असणारा निवडणूक रिंगणातील क्रम बदलण्यात आला असून, आता राजकीय पक्षांच्या
.
पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या आडनावाच्या अद्याक्षरानुसार यादी तयार केली जात असे. यामुळे अनेकदा राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांची नावे यादीत खाली जात असत. मात्र, नव्या सुधारणेनुसार आता पक्षाच्या दर्जानुसार उमेदवारांचा क्रम निश्चित केला जाणार आहे.
उमेदवारांची चार गटांत होणार विभागणी
नव्या नियमानुसार, ईव्हीएम मशीन आणि मतपत्रिकेवरील उमेदवारांची यादी खालील चार प्रवर्गांमध्ये विभागली जाईल:
गट 1: मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार.
गट 2: इतर राज्यांतील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार.
गट 3: राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेले पण अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार.
गट 4: अपक्ष उमेदवार.
मतदारांसाठी प्रक्रिया होणार सोपी
ग्रामविकास विभागाने पंचायत समिती निवडणूक नियमांमध्ये केलेल्या या सुधारणेमुळे निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि शिस्त येणार आहे. प्रत्येक गटातील उमेदवारांची नावे त्यांच्या त्या-त्या प्रवर्गात अद्याक्षरानुसार लावली जातील, मात्र राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना यादीत पहिले प्राधान्य मिळेल. यामुळे मतदारांना आपल्या आवडीच्या पक्षाचा उमेदवार शोधणे अधिक सोपे होणार आहे.
