Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणावर आज शोककळा पसरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे एका भीषण विमान अपघातात निधन झाले असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण प्रशासन हादरले आहे. मुंबईहून बारामतीकडे (Baramati) प्रवासाला निघालेल्या विमानाचा लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला, ज्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह इतरही प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
विमान दुर्घटनेचा थरार :
मुंबईहून (Mumbai) निघालेले हे विमान बारामती येथील धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे किंवा अन्य कारणाने कोसळले. या विमानात एकूण ६ जणांचा समावेश होता, त्यापैकी तीन व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर अजित पवार यांच्यासह उरलेल्या तिघांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
