नांदेड – शहरातील भगतसिंग चौक परिसरात ओळखीच्या व्यक्तींनी संगनमत करून एका व्यक्तीस मारहाण करत १५ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास भगतसिंग चौक, नांदेड येथे ही घटना घडली. आरोपी प्रशांत अर्जुन भोरगे आणि गंगाप्रसाद उर्फ रावण संजय भोरगे (दोघेही रा. कळहाळ ता. जि. नांदेड) यांनी संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मोबाईल घेण्यासाठी पैसे देण्यास सांगत फिर्यादीच्या खिशातील १५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले व जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी फिर्यादी विठ्ठल नारायण कळके (वय ४४, रा. कळहाळ ता. जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११९, ११५(२), ३५२, ३५१(१)(२)(३)(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे हे करत आहेत.