![]()
कुर्डुवाडी चार वर्षापूर्वी दुमजली नव्या व्यापारी गाळ्याचे सुरु झालेले काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत असून नुकत्याच झालेल्या पावसाळ्यामध्ये या अपूर्ण असलेल्या तळघरातील व्यापारी गाळ्यात सर्वत्र पाणी शिरले होते. त्यामुळे अपूर्ण असले तरी प्रथमदर्शनी हे व्या
.
कुर्डुवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगरपालिका कार्यालयाच्या अगदी समोर असलेल्या व्यापारी गाळ्यांमुळे नगरपालिकेची सुसज्ज अशी इमारत दृष्टीस पडत नाही व इतर काही कारणांमुळे सदर गाळे काढून या गाळ्यातील व्यापाऱ्यांना नगरपालिकेच्या शेजारी इमारतीच्या बाजूस दुमजली गाळ्यांची निर्मिती करून त्या गाळ्यांत या व्यापाऱ्यांना व्यापारासाठी जागा द्यायची असे काही प्रयोजन होते. गेली चार वर्षे हे गाळे अर्धवट स्थितीत पडले असून सदर दुमजली गाळ्यांचे स्लॅब व जीनाही पूर्ण झाला आहे. मात्र पावसाळ्यात या गाळ्यांध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. हे व्यापारी गाळे अगदी रोड लगत व नगरपालिका कार्यालयाजवळ चिटकून असल्यामुळे रोडवरील पावसाचे पाणी हे थेट गाळ्यांत शिरणारच असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
दर गाळ्यांचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेण्यासाठी ठेकेदाराने मुदत वाढ मागितली असल्याचे समजते पण नगरपालिकेने मुदत वाढ दिली का, सदर कामाची काही बिले काढलीत का, नसेल तर यावर कोणती कार्यवाही होणार आदी प्रश्न अनुत्तरित आहेत. महापालिकेच्या धर्तीवर अनामत रक्कम व दुकान भाडे इथल्या व्यापा-यांना परवडणार नाही. मुलभूत बांधकाम तत्त्वानुसार तळघरात अशी इमारत उभी करताना बेसमेंटच्या खाली एक खड्डा घेऊन टाकी केली जाते बाहेरच्या सर्व बाजूने डांबराचे कोटींग असते. पॉलीथीन शीट असते.
जे इथे दिसत नाही.पाणी ज्यावेळी मातीतून भिंतीकडे येते. त्याशीट मध्ये हेक्सागोनल किंवा ट्रँग्युलर पॅटर्न असतो.त्यातून पाणी झिरपत झिरपत भिंतीत न जाता खाली सरकते.खाली तळाला एक पाईप असतो त्याला छिद्र असताता तिथ दगडं टाकली जातात कारण माती त्यातून न जाता पाणी फिल्टर होऊन त्या पाईपातून पुढे टाकीला जाते. टाकीत एक मोटर बसवलेली असते. पाणी एका विशिष्ट लेवलला आल्यानंतर बाहेर फेकत असते, अशा प्रकारचे प्रयोजन अंडरग्राउंड गाळ्यांसाठी केले जाते.
या गाळ्यांबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी नगरपालिका अभियंता यांची प्रत्यक्ष कार्यालयात भेट न झाल्यामुळे फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. नागरिकांचा पैसा उधळला जात असल्याचा आरोप ^शहरात शंभरहून अधिक गाळे रिकामी पडून आहेत. त्यामुळे नगरपालिका हे गाळे कशासाठी उभारतात हे सामान्य नागरिकांना समजेना झाले आहे. केवळ नागरिकांचा पैसा दोन्ही हाताने उधळायचा इतकेच यातून दिसत आहेत.
न.पा. यापेक्षा नागरिकांच्या सोयी-सुविधांवर भर द्यावे. -अजित पूर्वत, नागरिक
अशी असेल अंडर ग्राऊंड इमारतीची निर्मिती कामाची काही बिले काढलीत का, नसेल तर यावर कोणती कार्यवाही होणार आदी प्रश्न अनुत्तरित आहेत. क वर्ग नगरपालिकेअंतर्गत व्यापारी गाळ्यांना महानगरपालिकेच्या धर्तीवर अनामत रक्कम व दुकान भाडे आकारल्यामुळे येथील निमशहरी भागातील व्यापाऱ्यांना ते परवडण्याजोगे नाही. त्यामुळे सुमारे शंभरहून अधिक गाळे रिकामे धूळ खात पडून आहेत. त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी सदर अनामत रक्कम व भाडे कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .ते होताना दिसत नाही.मात्र नवीन गाळे निर्मितीकरुन नागरिकांच्या खिशावर मात्र डल्ला मारला जात असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
