![]()
राज्याचे माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ऐन महापालिका निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना आणि आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर
.
धनंजय मुंडे यांच्या दिल्लीवारीबाबत विचारले असता सुनील तटकरे म्हणाले, “या भेटीवरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत, पण त्यात तथ्य नाही. काल संध्याकाळीच माझा आणि धनंजय मुंडे यांचा फोनवर सविस्तर संवाद झाला. मुंडे यांनी त्यांच्या एका साखर कारखान्याच्या कामासाठी आणि इतर विकासकामांसाठी अमित शाह यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली होती. विशेष म्हणजे, ही वेळ त्यांनी तब्बल एक महिन्यापूर्वीच मागितली होती आणि ती नेमकी काल मिळाली.”
कोकाटे प्रकरण आणि मुंडे-शहा भेट केवळ योगायोग
आमदार माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत आलेला न्यायालयाचा निकाल आणि त्यानंतर लगेचच झालेली मुंडे-शाह भेट, याचा काहीही संबंध नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “कोकाटे यांच्यावरील कारवाईचा निर्णय परवा आला आणि काल मुंडेंना भेटीची वेळ मिळाली, हा केवळ एक योगायोग आहे. या भेटीचा आणि त्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. भेटीनंतर मुंडे यांनी मला फोन करून चर्चेचा सर्व तपशील दिला आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय चष्म्यातून बघू नये.”
भाजपचा विरोध नाही, ती रणनीती
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला विरोध असल्याच्या चर्चाही तटकरे यांनी फेटाळून लावल्या. “भाजपचा राज्यात आम्हाला घ्यायला विरोध होतोय, असे कोण म्हणाले. असे भाजपच्या कोणत्या नेतृत्तवाने म्हटले मला सांगा. तसे कुणीही म्हटले नाही.
मुख्यमंत्र्यांनी बोलत असताना सांगितले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही भाजप आणि राष्ट्रवादी शक्तीस्थळे आहेत. दोन्ही ठिकाणी आम्ही युती करून लढलो, तर कार्यकर्ते विरोधकांना जाऊन मिळतील आणि त्याचा फायदा विरोधकांना होईल, असे राजकीय विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी मांडले. ही खरी वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे म्हटले म्हणजे, राष्ट्रवादीला विरोध आहे, असा अर्थ होत नाही.
राज्यात अनेक ठिकाणी सुद्धा भाजपने राष्ट्रवादीला विरोध केलेला नाही. माझी आणि प्रफुल्ल पटेल दोघांची अमित शहांशी भेट झाली. काल मुख्यमंत्र्यांसोबतही सखोल चर्चा केली. आज आणि उद्या त्यासंदर्भात आढावा घेणार आहोत. कशा पद्धतीने युती करता येईल, त्या दृष्टीकोनातून पुढील पावले उचलली जातील,” असेही असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा…
हॉटेल ‘तेजयश’ प्रकाश शिंदेंचेच:बुकिंगच्या लिंकवर प्रकाश शिंदेंचाच नंबर, सुषमा अंधारेंनी दिला पुरावा; ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांच्या भावाची कोंडी
सातारा जिल्ह्यातील सावरी येथील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळजनक गौप्यस्फोट करत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. “हॉटेल तेजयश माझे नाही, मी ती जागा चालवायला दिली आहे,” असा दावा प्रकाश शिंदे यांनी केला होता. मात्र, आज भर पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी गुगल मॅप आणि व्हॉट्सॲप लिंकचा ‘लाईव्ह डेमो’ दाखवत, “हॉटेल तेजयश प्रकाश शिंदेंचेच आहे आणि अजूनही तेच चालवत आहेत,” असा सणसणीत आरोप पुराव्यानिशी केला. सविस्तर वाचा…
