अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी – आयआयबी फास्ट २.०;
नीट, आयआयटी-जेईई, एमएचटी-सीईटीच्या तयारीसाठी प्रवेशपूर्व परीक्षा
नांदेड : दहावीतून अकरावीमध्ये जाणाऱ्या तसेच नीट, आयआयटी-जेईई आणि एमएचटी-सीईटीची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटतर्फे ‘आयआयबी फास्ट २.०’ ही प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना टॉप बॅच तसेच इतर मर्यादित संख्येच्या विशेष बॅचेसमध्ये प्रवेश, शिष्यवृत्ती व बक्षिसे मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
🔹 परीक्षा दिनांक: रविवार, २२ व २९ मार्च २०२६
🔹 वेळ: सकाळी ११–१ | दुपारी ३–५
🔹 परीक्षा पद्धत: ऑफलाईन (पेन-पेपर)
🔹 अभ्यासक्रम: दहावी (विज्ञान व गणित)
सदर परीक्षा आयआयबीच्या नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे-पिंपरी, पुणे-एफसी रोड, पुणे-बालाजीनगर, कोल्हापूर आणि अकोला या सर्व शाखांमध्ये होणार असून विद्यार्थी व पालकांनी या परीक्षेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी आयआयबीने भक्कम पावले उचलली आहेत. वर्षानुवर्षे अनेक उच्चांक प्रस्थापित करण्याबरोबरच अनुभवी प्राध्यापकांची टीम, अद्ययावत व सुसज्ज कॅम्पस, सूक्ष्म नियोजन आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन ही संस्थेची वैशिष्ट्ये ठरत आहेत.

नुकत्याच जाहीर झालेल्या जेईई मेन्स २०२६ च्या निकालात आयआयबीने जबरदस्त निकाल देत कुमारी अंजली (९९.५९८५७४४), अग्रवाल कृष्णा (९९.५७७५९५३), बरगळ आयुष (९९.५७६४६७७) आणि कदम आनंदा (९९.२१९००३५) यांनी विशेष यश संपादन केले आहे. तसेच एकूण ५५ विद्यार्थ्यांना ९५ पेक्षा अधिक तर १०३ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळाले आहेत.
मागील वर्षी एमएचटी-सीईटी २०२५ मध्ये राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (पीसीएम) गटात ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चव्हाण स्वरूप (९९.४२), सरपोतदार समीरा (९९.४२), कासले समीक्षा (९९.३९) आणि पाटील प्रज्वल (९९.३१) यांचा समावेश असून, इतर १३२ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवले आहेत.
दरम्यान, आतापर्यंतच्या सर्वात कठीण मानल्या गेलेल्या नीट २०२५ परीक्षेत श्रेयस डमके (१८४), स्वरूप बोदाडे (२०९), अपूर्वा केंद्रे (२९७) आणि कार्तिक भेंडकर (३३९) यांनी कॅटेगरी ऑल इंडिया रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इतर ५५+ विद्यार्थ्यांना एम्ससह टॉप मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे, तर इतर हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला आहे.
नीट, आयआयटी-जेईई, एमएचटी-सीईटी या सर्व कोर्सेससाठी स्वतंत्र कॅम्पस आणि टीम असून, इंजिनिअरिंग परीक्षांच्या तयारीसाठी कॉम्प्युटर लॅब उपलब्ध आहे.
