मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी सिल्लोड नगरपरिषदेकडून मोहीम:तत्पर कारवाईबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त




नागरिकांच्या समस्येची गंभीर दखल घेत नगर परिषदेतर्फे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला होता. याबाबत अनेक नागरिकांनी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा म्हणून मागणी केली होती. मोकाट कुत्र्यांमुळे विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपमुख्याधिकारी अजगर पठाण, स्वच्छता निरीक्षक सय्यद शहेबाज अली यांनी मोहिमेचे नियोजन केले. नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक आसिफ बागवान यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष पाहणी केली. स्वच्छता निरीक्षक अन्वर पठाण यांच्या नेतृत्वाखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या पथकाने शहरातील विविध भागांतून कुत्र्यांना पकडण्याची कारवाई सुरू केली आहे. ​शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या सुटकेसाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी सांगितले. या तत्पर कारवाईबद्दल सिल्लोडकरांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *