महाराष्ट्र ‘एपस्टीन फाईल’ प्रकरण : स्वयंघोषित ज्योतिष कॅप्टन अशोक खरात अटकेत

0
1773927278953

महाराष्ट्र ‘एपस्टीन फाईल’ प्रकरण : स्वयंघोषित ज्योतिष कॅप्टन अशोक खरात अटकेत

नाशिक : स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बलात्कार, लैंगिक शोषण आणि फसवणुकीसारखे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी तपासादरम्यान खरात याच्याकडून एक पेन ड्राईव्ह जप्त केली असून त्यामधून सुमारे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंच्या आधारे पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तपासात असेही समोर येत आहे की, या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा संपर्क होता. काही राजकीय व्यक्तींनी त्याच्या सांगण्यावरून विविध पूजा-अर्चा, तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार केल्याच्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, यापूर्वीही एका संस्थेने खरात याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्या वेळी संबंधित प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे आरोप करण्यात येत आहेत. तसेच, खरात याने स्थापन केलेल्या संस्थेशी संबंधित काही राजकीय व्यक्तींची नावे चर्चेत आली आहेत.

या पार्श्वभूमीवर, महिला सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर जबाबदारी असलेल्या पदांचा गैरवापर झाला का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित राजकीय नेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

पोलिसांकडून सध्या सखोल तपास सुरू असून, या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed