नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या जन्मदिनानिमित्त ६ जुलै रोजी भव्य वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भिक्खू संघाच्या उपस्थितीत प्रशिक्षण केंद्राच्या पार्किंग परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम, अष्टपुरस्कार प्रदान, चिवरदान, ग्रंथदान, भोजनदान, धम्मदेसना, वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आदी कार्यक्रम होणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देण्यात दिली.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन ६ जुलै रोजी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात आले आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानाचे महत्व लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक उपासिकांनी उपस्थित राहावे तसेच इच्छुकांनी प्रशिक्षण केंद्रात रक्तदान करण्यासाठी यावे असे आवाहन भिक्खू संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 13
