खरे मुस्लिम कोण?  – इराणचा जगातील मुस्लिम देशांना जाहीर सवाल  


एका बाजूला ट्रम्प सांगत आहेत की हे युद्ध लवकरच संपेल, पण वास्तव वेगळंच आहे. हे युद्ध इराणच्या बाजूने झुकत चाललं आहे, आणि स्वतः ट्रम्पच आक्रमक व अविचारी भूमिका घेताना दिसत आहेत. दरम्यान, इराणकडून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की हे युद्ध त्यांच्या अटींवरच संपेल. इराणचे वरिष्ठ नेते अली लारी जानी यांनी ठाम शब्दांत सांगितले आहे की इस्रायलला पुन्हा डोके वर काढण्याची संधी दिली जाणार नाही.अली लारी जानी यांनी मुस्लिम देशांनाही कडक इशारा दिला आहे. त्यांनी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या देशांवर जोरदार टीका करत सांगितले की, फक्त शब्दांनी नव्हे तर कृतीतून साथ द्यावी लागते. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की अनेक इस्लामी देशांनी केवळ औपचारिक वक्तव्ये केली, पण प्रत्यक्षात इराणच्या जनतेच्या पाठीशी कोणी उभे राहिले नाही.

दरम्यान, इराणने इस्रायलवर हल्ल्यांची मालिका सुरूच ठेवली आहे. बगदाद, दुबई, बहरीन यांसारख्या ठिकाणी तणाव वाढलेला आहे. अमेरिकेचे आणि इस्रायलचे हल्ले इराणच्या भूमीवर होत असतानाही, इराण मागे हटण्यास तयार नाही. इराणच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाबद्दल बोलताना, त्यांनी सेजील सारख्या प्रगत मिसाईलचा उल्लेख केला आहे, जे अतिशय वेगाने लक्ष्य गाठू शकतात. या प्रकारच्या क्षेपणास्त्रांना थांबवणे अत्यंत कठीण मानले जाते. अली लारी जानी यांनी सांगितले की, अमेरिकेने आणि झायोनिस्ट शक्तींनी इराणवर केलेला हल्ला हा इराणची ताकद कमी करण्यासाठी आखलेला कट होता. या हल्ल्यांमध्ये काही नेते, सैन्य अधिकारी आणि सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला, पण यामुळे इराणी जनतेची एकजूट अधिकच मजबूत झाली.

त्यांनी पुढे म्हटले की,

  • जो कोणी मुस्लिमांच्या वेदना ऐकतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो, तो खरा मुस्लिम नाही.असा संदेश प्रेषित मोहमद पैगंबर (स व स) दिलेला आहे. तो मुस्लिम देशांनी लक्षात ठेवावा. 
  • आज प्रश्न स्पष्ट आहे  तुम्ही कोणत्या बाजूने उभे आहात?

त्यांनी इशारा दिला की काही देशांनी तर इराणलाच शत्रू घोषित केले आहे, कारण त्यांच्या भूमीवरून अमेरिकेने इराणवर हल्ले केले. अशा परिस्थितीत इराण शांत बसेल, ही अपेक्षा चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खाडी देशांमध्येही हालचाली सुरू आहेत. हमद बिन जस्सीम बिन जाबेर अल थानी यांनी जीसीसी देशांना एकत्र येण्याचे आवाहन करत, एक मजबूत सुरक्षा आघाडी उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी पाकिस्तानसारख्या देशांनाही या आघाडीत सहभागी करण्याचा विचार मांडला.

इराणचे मंत्री अब्बास अराची यांनी स्पष्ट केले:
आम्ही युद्धविराम नको म्हणतो, याचा अर्थ आम्हाला युद्ध हवे आहे असा नाही. पण ही लढाई अशी संपली पाहिजे की आमचे शत्रू पुन्हा कधीही आमच्यावर हल्ला करण्याचा विचारही करणार नाहीत.
अमेरिकेतील परिस्थितीही वेगळी नाही. ट्रम्प आपल्या कार्यकाळातील आर्थिक यशाचा दावा करत असले तरी, युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकन शेअर बाजाराला मोठा फटका बसल्याचे दिसते.तो आकडा २ लाख कोटी अमेरिकी डॉलरचा आहे.

युरोपमध्येही मतभेद दिसत आहेत. किर स्टारमार यांनी स्पष्ट केले की त्यांनी ब्रिटनचे नौदल पाठवले नाही, कारण तो निर्णय देशहितासाठी आवश्यक होता. याआधी इराणकडून इशारा देण्यात आला होता की ब्रिटनने हस्तक्षेप केल्यास परिणाम गंभीर असतील. दरम्यान, इस्रायलवरही गंभीर आरोप होत आहेत  नागरिकांवर, शाळांवर हल्ले झाल्याचे दावे समोर येत आहेत. मृतांची संख्या वाढत असून जखमींचा आकडा हजारोंमध्ये पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

इराण मात्र दावा करत आहे की:

  • ते निष्पाप नागरिकांवर हल्ले करत नाहीत
  • त्यांचे लक्ष्य केवळ सैनिकी ठिकाणे आहेत
  • त्यांचा उद्देश स्पष्ट आहे  इस्रायलची युद्धक्षमता पूर्णपणे निकामी करणे

अहवालानुसार, १९ दिवस चाललेल्या संघर्षात इस्रायलचे अनेक इंटरसेप्टर सिस्टम निष्प्रभ झाले असून, इराणचे हल्ले अजूनही सुरूच आहेत.

सोर्स ..



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *