भारताला उद्या जगातील सर्वात मोठी शक्ती बनताना पाहून काही परदेशी शक्तींना भीती वाटत आहे. त्यामुळेच देशात सत्तेला सुरंग लागेल अशी परिस्थिती निर्माण करून, बाहेरील काही शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या देशात वेगवेगळ्या आंदोलनांची मालि
.
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, दीपक अमेरिकेतून इथे आले आणि त्यांचे इतके मोठे आंदोलन कसे चालते? हे लोक सोबत राज्यघटना घेऊन फिरतात, पण प्रत्यक्षात ते घटनेला मानत नाहीत. यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. देशाला अस्थिर करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असून, यामागील लोकांचा खरा हेतू तपासला पाहिजे.
महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही
जयकुमार गोरे म्हणाले की, दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या लोकांच्या मागे जितकी माणसे असतात, त्यापेक्षा जास्त त्यांचे कॅमेरे व मीडियासोबत असतात. नोकरीला लागलात तरी एवढा रोज मिळणार नाही, म्हणून काही लोक तिथे रोज आंदोलनाला बसतात. शाळा-कॉलेज सुटले की हे लोक आंदोलनात येतात आणि नंतर घरी निघून जातात. अशा दिशाभूल करणाऱ्या आंदोलनांचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही.
शैक्षणिक संस्थेकडून हजारो शिक्षकांना रोजगार
जयकुमार गोरे म्हणाले की, पूर्वी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका कधी होतात आणि तिथला आमदार कोण आहे, याची साधी चर्चाही होत नव्हती. परंतु, आज या दोन्ही निवडणुकांसाठी मोठी वातावरणनिर्मिती झाली असून पश्चिम महाराष्ट्रातील ही निवडणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महायुतीने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात अतिशय तगडे उमेदवार दिले आहेत. कौस्तुभ गावडे यांचे नाव जाहीर झाले तेव्हा काहींनी शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा असा सूर आळवला; मात्र त्यांच्या कुटुंबाला मोठा शैक्षणिक वारसा लाभला असून, जवळपास साडेसहा हजार शिक्षकांना रोजगार देण्याचे आणि लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे मोठे कार्य त्यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत सुरू आहे.
विद्यमान आमदार शिक्षकांना माहिती सुद्धा नाही
जयकुमार गोरे म्हणाले की, पुणे शिक्षक मतदारसंघाचा विद्यमान आमदार कोण आहे, हे बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नाही. ते कधीही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी भांडत नाहीत. आजच्या काळात प्रत्यक्ष भूमिका मांडणारा आणि शिक्षकांची बाजू धडाडीने सदनत व रस्त्यावर मांडणारा माणूसच आमदार असायला हवा. कोणताही आमदार असला तरी शेवटी त्याला निधी किंवा कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडेच जावे लागते. मात्र, महायुतीचा उमेदवार थेट मुख्यमंत्र्यांसोबत काम करणारा असल्यामुळे त्यांना मध्यस्थांची गरजच भासणार नाही. जर दुसरा कोणी निवडून आला, तर त्याला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठीच एक-दोन वर्षे लागतील. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच विनाअनुदानित शाळांना अनुदानास पात्र केले होते. त्यामुळे विकासकामांसाठी सरकार ज्या पक्षाचे आहे, त्या पक्षासोबतच आपल्याला राहावे लागेल.
मुख्यमंत्री प्रश्न सोडवतील
जयकुमार गोरे म्हणाले की, स्वयं-अर्थसहाय्यित शाळांना सरकारचा निधी वापरता येईल, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री शाळेच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर योग्य निर्णय घेतील. जे लोक खरोखरच लोकांचे प्रश्न सोडवतील, त्यांनाच जनतेने निवडून दिले पाहिजे. उगाच जंतरमंतरवर आंदोलने करणारा माणूस आपल्याला नको आहे. स्मिता जाधव यासुद्धा उच्चशिक्षित असून त्यांच्या कुटुंबीयांनी हजारो लोकांच्या हाताला काम दिले आहे. त्यांच्या हातात प्रसारमाध्यमांचे बळही असून त्यांना पदवीधरांचे सर्व प्रश्न अगदी उत्तम प्रकारे माहीत आहेत.
हे ही वृत्त वाचा अमित शहाच लॉरेन्स बिश्नोईचे खरे सूत्रधार!:संजय राऊतांचा पुन्हा आरोप; म्हणाले- 500 कोटींवरून शिंदेंना EDने समन्स पाठवावे, हरदीप पुरींच्या फोटोंवरून ‘रेझिम चेंज’चा पुनरुच्चार

“देशभरातील गुन्हेगारी टोळ्या आणि माफियांचे जाळे भारतीय जनता पक्षाच्या छत्राखाली आणण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. गुजरातच्या साबरमती तुरुंगातून गँग चालवणारा लॉरेन्स बिश्नोई हा केवळ बाहुले असून, त्यामागील खरा चेहरा अमित शहा यांचाच आहे. देशात आता विरोधकांना संपवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगचा वापर राजकीय हत्यांसाठी होऊ शकतो,” असा अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad