Diwali Lantern

Congress will gain control up to the booth through civil society, Congress’ new move


  • Marathi News
  • National
  • Congress Will Gain Control Up To The Booth Through Civil Society, Congress’ New Move

अजय प्रकाश | नवी दिल्ली23 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणातील राज्यांमध्ये नागरी समाजाचे (सिव्हिल सोसायटी) असे जाळे तयार करण्याच्या तयारीत आहे, ज्याचा थेट परिणाम बूथ स्तरापर्यंत होईल. ‘रचनात्मक काँग्रेस’च्या माध्यमातून लेखक, बुद्धिजीवी, कलाकार, सामाजिक संघटना, तरुण, इन्फ्लुएन्सर, युट्युबर व सोशल मीडियावर प्रभाव असलेल्या लोकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयत्न आहे.

यात पक्षाच्या समर्थकांपेक्षा सरकारची धोरणांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या, व्यंग करणाऱ्या किंवा सामाजिक प्रश्नांवर सक्रिय लोकांवर भर दिला जात आहे. काँग्रेसने १२ व १३ ऑगस्ट रोजी दिल्लीत दोन दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘रचनात्मक काँग्रेस’चा हा प्रयोग पुढे नेला आहे. पक्षाच्या रणनीतीत उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात आणि उत्तराखंड या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या गटांच्या स्वतंत्र सामाजिक व डिजिटल पोहोचचा उपयोग निवडणुकीत करून घेणे हा यामागचा उद्देश आहे.

गेल्या सुमारे तीन वर्षांपासून काँग्रेस हायसमानच्या पातळीवर यावर मंथन सुरू होते की, पक्षाची मूल्ये आणि धोरणांसोबत उभी राहणारी अशी जमिनी ताकद कशी तयार करावी, जी केवळ पक्ष कार्यकर्ता म्हणून नाही, तर स्वयंस्फूर्तीने समाजात काम करेल.

प्रत्येक राज्यात १ ‘सारथी’

रचनात्मक काँग्रेसशी जोडलेल्या लोकांना ‘सारथी’ म्हटले जाते. प्रत्येक राज्यात एक सारथी वेगवेगळ्या गटांमध्ये समन्वय साधेल व त्यांना काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. पक्ष थेट त्यांचे संचालन करणार नाही. उत्तराखंडमध्ये हे स्वरूप आधीच तयार झाले आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी नुकतीच तीन डझनांपेक्षा जास्त सोशल मीडिया क्रिएटर्सशी चर्चा केली. यात अनेक असे लोक आहेत जे राजकीय ओळखीशिवाय सरकारच्या धोरणांवर टीका करतात वा व्यंगचित्रांच्या माध्यमातून सवाल उपस्थित करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳