बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या घटनेत प्रत्यक्षदर्शी उमेश चौहान हा तरुण जखमी झाला असून, त्याने रुग्णालयातून या संपूर्ण घटनेचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे. १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी नेमकं काय घडलं, याचा अंगावर काटा आणणारा अनुभव त्याने कथन केला आहे. ‘मला वाटलं हार्ट अटॅक आलाय’ या घटनेचा तपशील सांगताना उमेश चौहान म्हणाला, “संध्याकाळी साधारण सातच्या सुमारास टायगर श्रॉफ खेळून बाहेर पडत होते. त्यांची गाडी गेटमधून बाहेर येत असताना मी कारच्या काचेजवळ उभा राहून मोबाईलवर शूटिंग करत होतो. त्याचवेळी अचानक एक मोठा आवाज झाला. सुरुवातीला मला वाटलं की गाडीचा टायर फुटला असावा. पण काही सेकंदांतच माझ्या छातीत तीव्र कळ आली आणि माझा श्वास कोंडू लागला.” वेदना असह्य झाल्याने आपण मदतीसाठी याचना केल्याचे सांगताना उमेश म्हणाला, “मी जोरजोरात ओरडू लागलो, ‘माझ्या छातीत दुखतंय, पंप करा, मला श्वास घेता येत नाहीये.’ मला गोळी लागली आहे, याचा मला अजिबात अंदाज नव्हता. मला वाटलं की मला हृदयविकाराचा झटका आला आहे.” कूपर रुग्णालयात समजले सत्य घटनेनंतर उमेशला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला हार्ट अटॅक नसून थेट गोळी लागल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. श्रॉफ कुटुंबाकडून मदतीचा हात या धक्कादायक प्रसंगानंतर टायगर श्रॉफ याच्या आईने स्वतः रुग्णालयात जाऊन उमेश चौहान याची भेट घेतली. त्यांनी उमेश आणि त्याच्या कुटुंबाला धीर देत ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असा विश्वास दिला. तसेच, टायगर श्रॉफनेही त्याच्या तब्येतीची विचारपूस करत उपचारासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिल्याचे उमेशने सांगितले. सध्या उमेशवर रुग्णालयात उपचार सुरू असून, मुंबई पोलीस या गोळीबार प्रकरणाचा सर्व अंगांनी सखोल तपास करत आहेत. —————– हेही वाचा.. मी आरोपींचा बचाव करणार:टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात वकील अजिंक्य मिरगल यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- न्यायालयात बाजू मांडणार टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना राजस्थानच्या कोटा येथून मुंबईत आणण्यात आले असून, आता त्यांच्या कायदेशीर बचावासाठी वकील अजिंक्य मिरगल पुढे आले आहेत. त्यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देत आपण न्यायालयात आरोपींची बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 12 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation रासपचा घोड्यावरून शेतपाहणी दौरा; शासनाच्या तुटपुंज्या मदतीचा निषेध:राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडून गळ्यात भोपळा अडकवून आंदोलन मुंबईत साकीनाका परिसरात अग्नितांडव:भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू, 6 जण गंभीर जखमी; 70 गाळे आगीच्या विळख्यात