बीफ शिजवण्यावरून भाडेकरूशी वाद घालणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेला अटक – VastavNEWSLive.com

[ads1]

कॅनडात बीफ वादावरून भारतीय महिलेला अटक आणि खाण्याच्या स्वातंत्र्यावर न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांची टिप्पणी

कॅनडा (प्रतिनिधी) -कॅनडामधील सरे  येथे भारतीय वंशाची घरमालकीण राज तिवाना हिने आपल्या घराचा काही भाग स्थानिक नागरिकांना भाड्याने दिला होता. भाडेकरू स्वयंपाकघरात बीफ  शिजवत असताना राज तिवाना यांनी त्यांच्या खोलीत घुसून गोंधळ घातला, तोडफोड व मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना शिवीगाळ केली. आपल्या मालमत्तेवर हे चालणार नाही, असा दावा करत त्यांनी भाडेकरूंना धमकावले. या घटनेची माहिती मिळताच कॅनडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून राज तिवाना यांना भाडेकरूशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक केली व हात मुरगाळून हतकडी घातली. परदेशात कायदा सर्वांसाठी समान असून कोणालाही इतरांच्या खाण्यापिण्याच्या हक्कावर गदा आणता येत नाही, हे या कारवाईवरून स्पष्ट झाले.

खाण्याच्या निवडीवर आणि असमान कारवाईवर न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांचे वक्तव्य

खाण्यापिण्याच्या मुद्द्यावरून कायदा आणि न्यायालयांच्या भूमिकेवर बोलताना माजी न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. गंगेत बोटीवर बसून चिकन खाल्ल्याच्या आरोपावरून एका विशिष्ट (अल्पसंख्याक) समुदायातील लोकांना कित्येक महिने जामीन नाकारण्यात आला होता. याउलट, बहुसंख्याक समुदायाच्या लोकांनी त्याच पवित्र नदीत बोटीवर बसून दारू पिल्यावर त्यांना अवघ्या काही तासांत जामीन मंजूर करण्यात आला, असे भेदभावाचे उदाहरण न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी निदर्शनास आणून दिले. खाण्याच्या निवडीवरून आणि धर्माच्या आधारावर कायद्याचा वापर कसा भिन्न पद्धतीने केला जातो, यावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

 


Post Views: 326










[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *