Mumbai Municipal Election BJP Shinde Sena Seat Dispute | मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाचा 125 जागांचा आग्रह: भाजपकडून केवळ 52 जागांचा प्रस्ताव; महायुतीत ठिणगी? शिंदे गट नाराज असल्याची चर्चा – Mumbai News



मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत 125 जागा लढवण्याचा आग्रह धरला असतानाच, भाजपने त्यांना केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची विश्वसनीय माहिती

.

2017 मध्ये एकसंध शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या, पुढे ही संख्या 99 वर पोहोचली. पक्षात फूट पडल्यानंतर यातील 47 नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली. तसेच 2007 आणि 2012 मधील माजी नगरसेवकांचा विचार करता आपल्याकडे 100 हून अधिक माजी नगरसेवकांची फौज असल्याचा दावा शिंदे गट करत आहे. याच बळावर त्यांनी 125 जागांवर दावा केला आहे. मात्र, भाजपने केवळ 52 जागांचा प्रस्ताव देऊन शिंदेसेनेची कोंडी केली आहे. परवा दोन्ही पक्षात प्रभागनिहाय चर्चा होणार असली, तरी या प्रस्तावामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे.

ठाकरे बंधूंचे आव्हान आणि भाजपची रणनीती

एकीकडे महायुतीत जागावाटपाचा तिढा असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीत मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. मुंबईत आजही ताकद असलेल्या उद्धव ठाकरेंना (10 आमदार, 3 खासदार) साथ देण्यासाठी राज ठाकरे यांची मनसे पुढे येण्याची चिन्हे आहेत. दोन्ही पक्षांत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, जर ही युती आकाराला आली, तर मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा अभूतपूर्व सामना रंगणार आहे. तसेच 2012 आणि 2007 मध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांचा विचार केल्यास शिंदेसेनेकडे जवळपास 100 माजी नगरसेवकांची फौज आहे. या सगळ्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी शिंदेसेनेला 125 जागा हव्या आहेत. पण भाजपने थेट 52 जागांची यादी देत शिंदेसेनेची कोंडी केली आहे.

विद्यमान नगरसेवकाची जागा संबंधित पक्षच लढणार

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपाच्या हालचालींना वेग आला आहे. आज मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जागावाटपाचा प्राथमिक तिढा सुटल्याचे चित्र आहे. या बैठकीत “ज्या ठिकाणी पक्षाचा विद्यमान नगरसेवक, ती जागा त्या पक्षाला,” या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर काही जागांची अदलाबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *