बदलाची बातमी:बेंगळुरूत प्रयोग; बस-मेट्रोने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कॅशबॅक मिळते




के. राजू बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी येथील आयटी कंपनीत इंजिनिअर आहेत. खासगी वाहनाने कार्यालयात पोहोचण्यासाठी त्यांना एक-दीड तास लागायचा. सार्वजनिक वाहतुकीची आव्हाने पाहता त्यांनी कधीही यात रस दाखवला नाही. पण आता ४ महिन्यांपासून राजू पब्लिक ट्रान्सपोर्टने ऑफिसला येतात. सहकाऱ्यांशी फायद्याबद्दल बोलतात. ते बेंगळुरूतील एका प्रयोगाचा भाग आहेत. त्यात लोकांना इन्सेंटिव्ह-रिवॉर्ड देऊन पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. डब्ल्यूआरआय इंडिया व टोयोटा मोबिलिटी फाउंडेशनच्या या पुढाकाराशी बायोकॉन, हायकल, एमएसएमई कंपन्याही जोडल्या गेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना सस्टेनेबल चॅम्पियन बनवतायेत
रोहन म्हणाले, इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये डिसेंबर २०२५ पासून हा पथदर्शी प्रकल्प सुरू झाला. आता लोकांच्या वागण्यात बदल दिसतो. बायोकॉनने या पुढाकारानंतर कॉर्पोरेट कम्युट पॉलिसीमध्ये बदल केला. सार्वजनिक वाहतुकीने येणाऱ्यांना रिवॉर्ड दिले. तसेच नियमित पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘सस्टेनेबिलिटी चॅम्पियन’ बनवले जात आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरल्यास ७५ रुपयांपर्यंत रिवॉर्ड १. ऑर्बिट वॉलेटः कर्मचारी मेट्रो-बसने प्रवास करतो, पायी चालतो, तर त्याला पाइंट्स मिळतात. यातून कूपन, सूटसारखे लाभ घेऊ शकतात. युजर्सना ७५ रु. चा रिवॉर्ड देतात. ऑर्बिटने एमएसएमईच्या २५ कर्मचाऱ्यांना NCMC कार्ड दिले. २. ट्यूमकः ट्यूमकने रूट प्लॅनिंग, तिकीट, प्रवासाची माहिती लास्ट माइल पर्यायांना एकाच ॲपमध्ये उपलब्ध करून दिली. पायलट स्टेजमध्ये १३ लोक वापर करतात. ३. व्हीबी : पब्लिक ट्रान्सपोर्टला गेमसारखे बनवले- या ॲपमध्ये युजर्सना बॅज, पॉइंट्स, अचीव्हमेंट्स आणि रँकिंग दिले जात आहे. याचा १५ लोक वापर करत आहेत. (शब्दांकन : रोमेश साहू)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *