![]()
मनपा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. शिंदेसेना आणि भाजप यांच्यात स्पष्ट मतभेद समोर आले आहेत. शिवसेनेने २०१५ मधील नगरसेवकांच्या संख्येवर आधारित फॉर्म्युल्यानुसारच युतीत जागावाटप व्हावे, अशी भूमिका आमदार प्
.
- शिवसेना : 2015 च्या फॉर्म्युल्यावरच युती
- भाजप : घाई नको, कोअर कमिटीत निर्णय
शहरात एकूण २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडणूक मैदानात उतरणार आहेत. यातील ६५ हिंदूबहुल जागांवर भाजप-शिवसेनेचा मतदार समान असल्याने युती झाली नाही तर मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युती होणार की स्वबळावर लढणार, यावरच सध्या राजकीय हालचाली केंद्रित झाल्या आहेत.
उद्धवसेनेच्या मुलाखती १७ ला
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेने मनपा निवडणुकीसाठी स्वतंत्र निवडणूक समिती जाहीर केली आहे. १७ डिसेंबर रोजी मुलाखती होणार आहेत.
शिंदेसेनेच्या निवडणूक समितीत ५ जण
एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने शिवसेनेने महापालिका निवडणूक नियोजनासाठी समन्वय समिती आणि निवडणूक समित्या जाहीर केल्या आहेत. ५ जणांची प्रमुख समिती आहे. आज शिंदेसेनेच्या मुलाखती होणार आहेत.
संख्याबळावर शिवसेनेचा भर
२०१५ मध्ये शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले होते, तर ९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या ३८ जागांवर दावा केला जाईल. भाजपचे २३ नगरसेवक वगळून उरलेल्या जागांचे वाटप करावे हे सूत्र शिवसेना मांडणार असल्याचे मानले जाते.
सन्मानजनक तोडग्याची भाजपला अपेक्षा
निवडणूक स्वबळावर लढण्याचाही पर्याय भाजपने खुला ठेवला आहे. ‘युतीबाबत घाई केली जाणार नाही. दोन्ही पक्षांच्या कोअर कमिटीत चर्चा होईल. सन्मानजनक तोडगा निघाला तरच पुढचा निर्णय घेतला जाईल असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. दहा वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असे किशोर शितोळेंनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखती आज
वंचित बहुजन आघाडीमार्फत १५ डिसेंबर रोजी पक्ष कार्यालयात मनपा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची अनुषंगाने मुलाखती घेण्यात येणार आहेत.
दिव्य मराठी इनसाइड स्टोरी – ‘राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलता येणार नाही’
भाजपने मागील १० वर्षांत संघटनात्मक बांधणी मजबूत केली असून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत त्याचा फायदा झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ‘राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलता येणार नाही’ अशी भूमिका भाजप जिल्हाध्यक्षांकडून मांडली जात आहे. शिवसेना आपल्या पूर्वीच्या ताकदीच्या आधारे अधिक जागांची मागणी करीत आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आपल्या स्वकीयांसाठी जागा सोडून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
