Vegetable garden blooms in school for students’ toxin-free diet | विद्यार्थ्यांच्या विषमुक्त आहारासाठीशाळेतच फुलवली भाज्यांची परसबाग: वैजापूरच्या लोणी बुद्रुकचा उपक्रम – Chhatrapati Sambhajinagar News



लोणी बुद्रुक येथील शाळेच्या परसबागेत लावलेला भाजीपाला.

तालुक्यातील लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सेंद्रिय परसबाग तयार केली आहे. विद्यार्थ्यांना रोजच्या जेवणात ताज्या आणि पोषक भाज्यांचा पुरवठा व्हावा, रासायनिक फवारणीच्या भाज्यांपासून त्यांचा बचाव व्हावा, विषमुक्त आहार मिळावा अ

.

मुलांच्या आरोग्यासाठी गावच पुढे आले. जि. प. शाळेतील परसबागेची मशागत व देखभाल गावकरीच करत आहेत. ग्रामपंचायतीने ६ गुंठे क्षेत्रावर कायमस्वरूपी सेंद्रिय भाजीपाला परसबाग विकसित केली आहे. या परसबागेतील भाज्या शाळेत मध्यान्ह भोजनात वापरल्या जातात. आता गावकरीही अशा बागा लावत आहेत.

पोषणमूल्यानुसार वेळापत्रक

या परसबागेत कोबी, फ्लॉवर, भेंडी, मिरची, भोपळा, ब्रोकोली, दोडका, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पालक अशा भाज्या लावल्या. मुलांना पोषणमूल्ये मिळावी यासाठी शाळेच्या मध्यान्ह भोजनाचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार दररोज एक भाजी काढून ती बनवली जाते, असे मुख्याध्यापक सोनवणे यांनी दिली.

२८ बाय ५ फुटांचे ९ बेड गावाचे उपसरपंच गणेश इंगळे यांनी ६ सप्टेंबर २०२५ रोजी या उपक्रमाची सुरुवात केली. परसबागेसाठी वीटबांधणी करून २८ फूट लांबी व ५ फूट रुंदीचे ९ बेड तयार केले. त्यामध्ये शेणखत, गांडूळखत, निंबोळी पेंड व सेंद्रिय घटकांचा वापर करून भाजीपाला लागवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *