माहूर येथे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे श्री रेणुका मातेचे दर्शन

माहूर येथे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे श्री रेणुका मातेचे दर्शन

माहूर | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री तथा ज्येष्ठ नेते ना. डॉ. राधाकृष्णजी विखे पाटील यांनी आज माहूर येथील श्री क्षेत्र रेणुका माता मंदिरात भेट देत श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मनोभावे पूजा व आरती करून राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

या प्रसंगी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. भागवत देवसरकर, अधीक्षक अभियंता श्री. सुधाकर कचकलवार, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. भोंडवे, तहसीलदार श्री. अभिजीत जगताप, विशेष कार्य अधिकारी श्री. किशोर मराठे, श्री. देवराव भिसे, श्री. देवानंद वानखेडे यांच्यासह रेणुका माता मंदिर समितीचे विश्वस्त उपस्थित होते.

ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *