Nagpur: Sanjay Shirsat Comments on NDA, Drug Issues, and Hindutva Politics | स्वत:च पक्ष संपत चालला असताना एनडीएबद्दनल भविष्यवाणी सुरू: शिरसाटांचा चव्हाणांना टोला, म्हणून विरोधी पक्षनेता नेमता आला नाही – Nagpur News



काँग्रेसचे मोठे नेते एनडीएबद्दल भाकीत करत आहे, तिकडे त्यांचा पक्ष संपत चालला आहे. या मोठ्या नेत्यांना काय झाले हेच समजत नाही. असे काही बदल होणार अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

.

संजय शिरसाट म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत त्यांना चांगले माहिती आहे कायदा काय सांगतो. विरोधी पक्षनेत्यासाठी काय अडचण आहे हे अभ्यासू नेत्यांना माहिती आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेता नेमला जाऊ शकत नाही हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, ही कायद्याची अडचण आहे. राज्यात ड्रग्जचे प्रमाण वाढत चालले आहे. बंदुकीने गोळ्या घालण्यापेक्षा मुलांना ही सवय लावत वेगळ्या मार्गावर नेले जात आहे. दहशतवादी पकडण्यापेक्षा या ड्रग्ज माफियांना पकडणे गरजेचे आहे.

म्हणून आम्ही रेशीमबागेत येतो

संजय शिरसाट म्हणाले की, संघाचा बेस हा देशप्रेमाचा आहे. या देशामध्ये सौदंर्याचे वातावरण असावे ही संघाची भूमिका राहत आलेली आहे. म्हणून आम्ही जेव्हा नागपूरच्या अधिवेशनात येतो त्यावेळी रेशीमबागेत येत सर्वांची भेट घेत असतो.

हिंदूत्व सोडल्याने हाल त्यांचे हाल

संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेनेचे दोन भाग झाले कारण ज्यांनी हिंदूत्वांचा विचार सोडला त्यांना त्या गोष्टीचा परिणाम भोगावे लागले. शिवसेना प्रमुखांनी ज्या कडवडपणे हिंदुत्व पुढे नेले ते हिंदूत्व जे विसरले त्यांचे हाल तुम्ही पाहात आहात. तर आम्ही ते विसरल्याने आमची प्रगती सुरू आहे.

अजित पवार आले नाही हा त्यांचा प्रश्न

संजय शिरसाट म्हणाले की, रा.स्व.संघाच्या बौद्धिकसाठी अजित पवार मागील वेळेस सुद्धा आले नव्हते यावेळीही आले नाही. कुणी आले कुणी आले नाही हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. संघ कोणाला बोलवत नसतो, हे काही बंधंनकारक नाही असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! – एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या कार्याचे स्मरण केले. विशेषतः शिवसेना आणि संघाची विचारसरणी मिळतीजुळती असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुरुवातीला संघाच्या शाखेतून प्रेरणा घेतली होती. आरएसएसच्या आपत्कालीन मदतकार्यात आणि राष्ट्रसेवेतील योगदानाचाही त्यांनी गौरव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *