Thalapathy Vijay NetWorth | कोट्यवधींचं मानधन, अब्जावधींची संपत्ती; थलपती विजयच्या नेटवर्थचा आकडा वाचून थक्क व्हाल
Thalapathy Vijay NetWorth | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि आघाडीचा सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) सध्या त्याच्या राजकीय प्रवेशामुळे आणि वैयक्तिक आयुष्यातील उलथापालथीमुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनयाच्या दुनियेत ६९ चित्रपटांचा यशस्वी टप्पा गाठल्यानंतर आता त्याने राजकारणात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. त्याचा ‘जना नायकन’ (Jana Nayakan) हा शेवटचा चित्रपट ठरला असून, तो प्रदर्शनापूर्वीच अनेक विवादांमध्ये अडकला आहे.
डोळे दीपवणारी संपत्ती आणि भरमसाठ मानधन
विजयच्या संपत्तीचे आकडे खरोखरच थक्क करणारे आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी त्याने नुकत्याच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्याची एकूण मालमत्ता तब्बल ६०३.२० कोटी रुपये (६.०३२ अब्ज) इतकी आहे. सर्वसाधारणपणे एका चित्रपटासाठी १०० ते १२० कोटी रुपये मानधन घेणाऱ्या विजयने आपल्या या शेवटच्या ‘जना नायकन’ चित्रपटासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची घसघशीत रक्कम आकारली होती.
त्याच्या केवळ बँक खात्यात २१३ कोटी रुपयांची मोठी रोख बचत आहे. याशिवाय, चेन्नईसारख्या शहरात त्याचा ७० ते ८० कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे. त्याच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू ५३० (BMW 530), टोयोटा लेक्सस (Toyota Lexus) आणि टोयोटा वेलफायर (Toyota Vellfire) यांसारख्या तब्बल ८ कोटी रुपयांच्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
२७ वर्षांच्या वैवाहिक जीवनाला नजर; घटस्फोटाची चर्चा
वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण करणाऱ्या विजयचे व्यावसायिक आयुष्य जितके यशस्वी राहिले, तितकेच त्याचे वैयक्तिक आयुष्य सध्या अडचणीत सापडले आहे. त्याची पत्नी संगीता (Sangeeta) हिच्या नावेही १५.७६ कोटी रुपयांची स्वतंत्र मालमत्ता आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या दोघांच्या २७ वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनात मोठी कटुता आल्याची चर्चा रंगली आहे.
News Title: Thalapathy Vijay Networth Wealth Assets And Political Entry
