Beware of Fake Census Form Links
![]()
देशाचे नियोजन, विकास व कल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी जनगणना प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. पण या जनगणनेच्या नावाखाली सोशल मीडियावर काही बनावट ऑनलाइन अर्ज व लिंक फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकरणी नागरिकांच्या वैयक्तिक मा
.
देशाच्या विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या जनगणना 2027 ला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यंदा प्रथमच नागरिकांना स्व-गणनाया डिजिटल सुविधेद्वारे स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. पण सोशल मीडियावर या प्रकरणी एक बोगस अर्ज व्हायरल झाला आहे. सरकारने नागरिकांना या अर्जापासून दूर राहण्याचा सल्ला देत सरकारने निश्चित केलेले संकेतस्थळ व अॅपद्वारेच आपली माहिती भरण्याचा सल्ला दिला आहे.
DGIPR ने काय केले आवाहन?
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) आपल्या पोस्टद्वारे जनतेला जनगणना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. डीजीआयपीआरने म्हटले आहे की, जनगणना 2017 च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे. जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच 33 अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे.
1. स्व नोंदणी – नागरिक https://se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला ‘SE ID’ त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल.
2. थेट माहिती देणे – दि. १६.०५.२६ ते १४.०६.२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल.
सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने म्हटले आहे.
1 ते 15 मेपर्यंत करता येईल स्व-गणना
सरकारने स्व-गणना करण्यासाठी 1 मे ते 15 मे हा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने आपली व आपल्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत घरयादी व घरणना टप्पा पार पडणार आहे. या कालावधीत नागरिकांनी स्वतःहून माहिती भरल्यास, पुढील प्रक्रिया प्रत्यक्ष भेटीत अधिक सुलभव व जलद पद्धतीने होईल. या पार्श्वभूमीवर सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाने नागरिकांना सोशल मीडियावर फिरणाऱ्या बोगस अर्जांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
2027 ची जनगणना प्रक्रिया पूर्णतः डिजिटल
देशात 2011 पासून जनगणना झाली नाही. यावेळी होणाऱ्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या इतिहासात प्रथमच ही प्रक्रिया पूर्णतः डिजिटल पद्धतीने राबवली जात आहे. या जनगणनेत मोबाइल अॅप्सचा वापर, ऑनलाइन सेल्फ एन्युमरेशन व रिअल टाइम मॉनिटरिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. 1931 नंतर पहिल्यांदाच या जनगणनेत जातनिहाय २०११ नंतर देशभरात जनगणना झालेली नाही. यावेळी होणाऱ्या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या इतिहासातील ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. या जनगणनेत मोबाइल अॅप्सचा वापर, ऑलाइन सेल्फ एन्युमरेशन आणि रिअल टाइम मॉनिटरिंग यांचा समावेश करण्यात आला आहे.
