Women Directors Shine at Maharashtra State Amateur Marathi Theatre Competition | महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या रंगभूमीवर महिलांची दमदार पावले: तीन दिग्दर्शिका, लेखिकेच्या सर्जनशीलतेचा ठसा – Ahilyanagar News
![]()
माऊली संकुल सभागृहात नुकत्याच पारपडलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा रंगभूमीवरील बदलते सकारात्मक चित्र प्रकर्षाने दिसून आले. विशेष म्हणजे, यंदा एकूण 22 नाटके सादरझाली असून यात ग्रामीण नाट्यसंघांचा मोठा
.
कल्पना नवले (माझं घर), विद्या जोशी (लास्ट स्टॉप) व ज्योती खिस्ती (फार्महाऊस) या 3 महिला दिग्दर्शिकांनी यंदा नाटकाचे दिग्दर्शन करत संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पेलली. तर ‘जन्मवारी’ या नाटकाचे लेखन हर्षदा बोरकर यांनी केले.या पैकी कल्पना नवले दिग्दर्शित ‘माझं घर’ हेनाटक स्पर्धेत तिसरे आले. आशयघन कथा, सामाजिक जाणिवा आणि सशक्त सादरीकरण यामुळे या नाटकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय प्रकाश योजना, रंगमंच व्यवस्थापन, वेशभूषा, रंगभूषा अशा बॅकस्टेज विभागांमध्येही महिला व युवतींची उपस्थिती ठळकपणे जाणवली. ही स्पर्धा नव्या पिढीतील कलाकारांना व्यासपीठ देणारी व समाजातील सकारात्मक बदल अधोरेखित करणारी ठरली.अहिल्यानगरची रंगभूमी अधिक समावेशक,सशक्त आणि प्रेरणादायी होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. पारंपरिक शहर केंद्रितरंगभूमी पलीकडे जाऊन ग्रामीण कलाकारांनी आपली ताकद दाखवून दिली.
अभिनय, नेपथ्य, वेशभुषासंगीत दिग्दर्शनात बाजी
यंदाची राज्य नाट्य स्पर्धा अधिक चुरशीची होऊन निकालातही महिलांनी बाजी मारली.उत्कृष्ट अभिनय व नेपथ्याचे प्रत्येकी एक,अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्रे 5 जणींनी,उत्कृष्ट वेशभूषेची 3 व संगीत दिग्दर्शनात दोघींनी, असा एकूण 12 जणींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
समृद्ध करणारा अनुभव
स्पर्धेत 15 वर्षांपासून अभिनय करत असून बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक पटकावले.म्हणून 4 वर्षांपासून या स्पर्धेतही अभिनय व दिग्दर्शनाची दुहेरी जबाबदारी उचलली.अभिनयासोबत महिलांना दिग्दर्शन व लेखनाच्या संधी मिळणे, ही मोठी बाब आहे.रंगभूमीवर स्त्री दृष्टीकोन अधिक ठळकपणे मांडला जावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- विद्या जोशी, दिग्दर्शिका
