![]()
अमरावती संत गाडगे बाबांचा ६९ वा यात्रा उत्सव आज रविवार, १४ डिसेंबरपासून येथील गाडगेबाबा समाधी मंदिर समोरच्या पटांगणात सुरु होत आहे. या महोत्सवानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी गाडगेबाबांचे महानिर्वाण झाले
.
२० डिसेंबर, शनिवारी सकाळी दहा वाजता गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजनाने पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ होईल. महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त सौम्या चांडक शर्मा यांच्या हस्ते व संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख आणि समाजसेवक डॉ. राजकुमार लंगडे व इतर मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दैनंदिन कार्यक्रमामध्ये परमपूज्य सितारामजी बाबा यांच्या कृपापात्र शिष्या सुश्री महेश्वरी देवी यांची श्रीमद् भागवत कथा आयोजित केली असून दररोज दुपारी १ ते ४.३० ही या कथेची वेळ आहे. तत्पूर्वी १४ ला दुपारी १२.३० ते १ या वेळात नामदेवरावजी रोडे यांचे स्मृतीप्रीत्यर्थ अंध अपंगांना अन्नदान केले जाईल. या ज्ञानदान सप्ताहात सहभागी व्हावे असे आवाहन विश्वस्त बापूसाहेब देशमुख व्यवस्थापक प्रकाश महात्मे व उत्सव समितीचे प्रसिद्धी प्रमुख गजानन देशमुख-दर्यापुरकर यांनी केले आहे.
गुरुवारी सत्यपाल महाराजांची सत्यवाणी दररोजच्या कीर्तनासाठी देशातील नामवंत कीर्तनकारांना ही निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प नारायण महाराज पडोळे, राष्ट्रीय कीर्तनकार विवेक कुरुंदकर, राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प प्रशांत महाराज ठाकरे,श्याम वानखडे यांचा समावेश असून समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची सत्यवाणी १८ डिसेंबरला रात्री ८ वाजता सादर होणार आहे. पंकज महाराज पोहोकार यांचे राष्ट्रीय कीर्तन इतर दैनंदिन कार्यक्रमांमध्ये ह भ प लक्ष्मीबाई गहूकार यांचे गाडगे बाबांच्या जीवनावर आधारित प्रवचन, हरिपाठ, सामुदायिक प्रार्थना व त्यानंतर सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळात ज्ञानेश्वर जी सौदागरे व त्यांचा संच यांचे भक्ती संगीत सादर होईल.
रात्री ९ ते १०.३० या वेळात सोनी मराठी फेम ह भ प पंकज महाराज पोहोकार यांचे राष्ट्रीय कीर्तन होणार आहे. सप्त खंजेरी वादनाचे शनिवारी आयोजन यात्रोत्सवादरम्यान २० डिसेंबरला रात्री ह भ प ऋषिकेश रेडे यांची खंजेरी एक्सप्रेस तर ह भ प भरतजी महाराज रेडे यांचा सप्त खंजिरी कार्यक्रम होईल. त्यानंतर संत गाडगे बाबांच्या महानिर्वाण बद्दल बापूसाहेब देशमुख माहिती सादर करणार आहेत. त्यानंतर सामुहिक श्रद्धांजली गीत कार्यक्रमाने स्मृतिदिन व पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
