25 years of Modi’s public life, programs from 17, month-long ‘Seva Sankalp Abhiyan’

[ads1]

  • Marathi News
  • National
  • 25 Years Of Modi’s Public Life, Programs From 17, Month long ‘Seva Sankalp Abhiyan’

नवी दिल्ली20 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १७ सप्टेंबरपासून महिनाभराचे ‘सेवा संकल्प अभियान’ राबवणार आहे. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनी बुधवारी याची घोषणा केली. ते म्हणाले, मोदींचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा केला जाईल व देशभरात रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील. १७ सप्टेंबरच्या संध्याकाळी ‘आशीर्वाद का दिया’ कार्यक्रम होईल.

त्यात विशेषतः सरकारी योजनांचे लाभार्थी कुटुंबे मोदींच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवे लावतील. या दिव्यांद्वारे विकसित भारत २०४७ चा संकल्प घेतला जाईल. ७ ऑक्टोबर रोजी मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने जिल्हा मुख्यालयांमध्ये ‘सेवा ज्योती कलश यात्रा’ काढली जाईल. यात पदयात्रा, मोटारसायकल व सायकल रॅली असतील. १,००० विकसित भारत २०४७ चा सामूहिक संकल्प घेतला जाईल.

आवाहन: २५ मिनिटे श्रम

‘सेवा मेरा योगदान’ मध्ये २५ विषयांवर २५ मिनिटे श्रमदानासाठी प्रेरित केले जाईल. तालुका पातळीवर ‘सेवा सेतू’ शिबिरांत लोकांना योजनांचा लाभ मिळेल.

२ ला स्वच्छता मोहीम

२ ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहीमही राबवली जाईल. तरुणांसाठी नाविन्यता स्पर्धा होतील. मानवी रांगोळी काढण्याचीही योजना आहे.

जेन-झीसाठी ‘यात्रा’

भाजपाच्या २० युवा तुकड्या वडनगर आणि वाराणसीदरम्यान प्रवास करतील. सुमारे १,००० तरुण १० राज्यांमधून जात ग्रामीण, शेतकरी, अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *