अमरावतीचा पार्थ साबूचे सीए इंटरमीडिएट परीक्षेत यश:देशात मिळवला 37 वा क्रमांक, 'कॉस्टिंग'मध्ये 100 पैकी 100 गुण




अमरावती येथील विद्यार्थी पार्थ रोशन साबू याने नुकत्याच जाहीर झालेल्या सीए इंटरमीडिएट परीक्षेच्या निकालात यश मिळवले आहे. त्याने अखिल भारतीय स्तरावर ३७ वे स्थान पटकावले आहे. या कामगिरीमुळे तो अमरावती जिल्ह्यातून पहिला आला आहे. पार्थ साबूने या परीक्षेत ‘कॉस्टिंग’ या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले आहे. पार्थ हा श्रीमती पुष्पादेवी राधेश्यामजी साबू यांचा नातू असून, रोशन राधेश्यामजी साबू आणि दर्शना साबू यांचा मुलगा आहे. तो सध्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राहणारे त्याचे काका सीए नितीन चिचानी आणि काकू सीए कल्पना चिचानी यांच्या मार्गदर्शनाखाली सीएचे शिक्षण घेत आहे. त्याच्या यशात त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात आले. पार्थच्या या यशाबद्दल कोल्हापूर येथील आराधना बाहेती यांच्यासह त्याचे सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि अमरावतीकरांकडून त्याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *