Amruta Fadnavis Strong Reaction On Nasrapur Child Abuse Murder Case

0
db-temp-cover-marathi-2026-05-09t125116758_1778311327.jpg



पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेचे संतप्त पडसाद उमटत असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर अत्यंत तीव्र श

.

१ मे रोजी राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही मन सुन्न करणारी घटना घडली होती. एका ६५ वर्षीय नराधमाने ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर, पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला होता. या भीषण घटनेमुळे नसरापूर ग्रामस्थ आणि पीडितेचे कुटुंब प्रचंड संतापात आहे. आत या प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

नेमके काय म्हणाले अमृता फडणवीस?

पुण्यातील नसरापूरसह पर्वती आणि थेऊर परिसरातही अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “आरोपी हा माणसाच्या रुपातील राक्षस आहे. अशा गुन्ह्यांसाठी माफी दिली जाऊ शकत नाही. अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. पण आपण एक समाज म्हणून आणि एक कुटुंब म्हणून आपण सतर्क राहिले पाहिजे कारण बहुतेक प्रकरणांमध्ये आरोपी हे पीडित व्यक्तीच्या ओळखीचे असतात, अनेकदा आपण त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास टाकतो, अशाच व्यक्ती अशी कृत्य करतात. याबरोबरच, शाळांनी गुड टच आणि बॅड टचबाबत अधिक जनजागृती कार्यक्रम राबवले पाहिजेत.”

अमृता फडणवीस म्हणाल्या, “माझा सरकारला असा सल्ला असेल की असे गुन्हे करणारे लोकांना सहजासहजी बाहेर येऊ दिले जाऊ नये. त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे. जर तुम्ही मला माझे वैयक्तिक मत विचाराल, तर लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर सार्वजनिकरीत्या शिक्षा दिली पाहिजे. पण आपण लोकशाहीमध्ये राहतो, आपण कायदा आपल्या हातात घेऊ शकत नाहीत. मात्र सराकार, पोलिस आणि न्यायव्यवस्थेने अशा लोकांना सोडू नये आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा शिक्षा मिळेल याची खात्री करावी.”

सुरक्षेच्या कारणास्तव व्हीसीद्वारे सुनावणी

नसरापूर प्रकरणातील ६५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नागरिकांमध्ये असलेला प्रचंड संताप आणि सुरक्षेची परिस्थिती पाहता, आरोपीला प्रत्यक्षात न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (खून), ६४ (बलात्कार), ७४ (विनयभंग), आणि ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत अत्यंत कडक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed