Chhatrapati Sambhajinagar Yuvsena Demands Nashik Conversion Racket Probe
![]()
नाशिक येथे उघडकीस आलेल्या कथित धर्मांतर रॅकेट प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या निदा एजाज खान हिला 7 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली असल्याने छत्रपती संभाजीनगर युवासेनेच्या वतीने पोलिस उपायुक्त पंकज आतुलकर यांची भेट घ
.
सदर प्रकरणाचा तपास केवळ वरवर न करता सर्व बाजूंनी सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. महिलांची सुरक्षितता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित हे अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्याने दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका युवासेनेच्या वतीने मांडण्यात आली..
याप्रसंगी युवासेना विभागीय सचिव धर्मराज दानवे, जिल्हाधिकारी हनुमान शिंदे, महाविद्यालय कक्षप्रमुख अभिजीत थोरात, शहराधिकारी रामेश्वर कोरडे, अजय चोपडे, स्वप्नील डीडोरे, शहर समन्वयक मधुर चव्हाण, शहर चिटणीस नागेश थोरात, हरीष पाटील, साहिल लहाने, साईनाथ थोरवे, अमित लहाने, चरण शिंदे व धनपाल राजपूत आदी उपस्थित होते. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात महिला आयोगाच्या 25 शिफारशी
नाशिकमधील गाजलेल्या टीसीएस प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असून, या अहवालानंतर तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा, कथित धर्मांतराचे आरोप, तसेच पीडित महिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयोगाने अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आयोगाच्या शिफारशींनुसार कठोर आणि प्रभावी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. वाचा सविस्तर आरोपी निदा खानला 11 मे पर्यंत पोलिस कोठडी
नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना, यातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने २ मे रोजी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ती फरार होती. अखेर गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले. आज तिला नाशिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची ११ मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. वाचा सविस्तर
