MIM नगरसेवक मतीन पटेलचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल:तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप; कारवाईची मागणी
![]()
नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आपल्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी वादात सापडलेले एमआयएमचे छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन खान यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते एका तरुणीला व्हिडिओ कॉलवर कपडे काढण्याचा इशारा देताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिक व छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री केलेल्या एका संयुक्त कारवाईत निदा खानला अटक केली. निदा खान ही नगरसेवक मतीन पटेल यांच्या नारेगाव परिसरातील एका घरात लपून बसली होती. हे घर त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. आता मतीन पटेल यांच्यावर निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांचा मोबाईल फोनही जप्त केला आहे. यामुळे मतीन पटेल यांचा पाय खोलात गेल्याची चर्चा असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. काय आहे वादग्रस्त व्हिडिओत? वादग्रस्त व्हिडिओत मतीन पटेल व एक तरुणी दिसून येत आहे. त्यात मतीन हा सदर तरुणीला कपडे काढण्याची सूचना करतो. त्यानंतर ती तरुणी तो सांगेल त्या प्रमाणे करते. सकल हिंदू समाजाने या व्हिडिओवर तीव्र संताप व्यक्त करत मतीन पटेल यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मतीन पटेल यांनी सदर तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याकडून असे कृत्य करून घेतल्याचा आरोप यासंबंधी केला जात आहे. तसेच त्यांची नगरसेवक पदावरून हकालपट्टी करण्याची मागणीही या प्रकरणी केली जात आहे. या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही मतीन पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही. आत्ता पाहू कोण आहे मतीन पटेल? मतीन पटेल हा एमआयएमचा नगरसेवक आहे. निवडणूक काळातही त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. मतीन पटेल हा एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या निकटवर्तीय नगरसेवकांपैकी एक असल्याचे मानले जाते. मतीन पटेल MIM साठी ठरणार डोकेदुखी नाशिक टीसीएस प्रकरणातील गंभीर आरोप आणि व्हायरल व्हिडिओमुळे एमआयएम पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेषतः हा वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यताही यासंबंधी व्यक्त केली जात आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत लोकप्रतिनिधींनी आपल्या वर्तनाची जबाबदारी ओळखली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तर दुसरीकडे, संबंधित व्हिडिओची सत्यता आणि त्यामागील नेमकी पार्श्वभूमी समोर येणे आवश्यक असल्याचे मतही काहींकडून मांडले जात आहे.
