पलायन नाट्यानंतर तीन युवक आणि एका महिलेला न्यायालयीन कोठडी

0
IMG_20260505_151502.jpg


नांदेड(प्रतिनिधी) -काल रात्री पोलीस ठाणे येथे घडलेल्या पलायन नाट्यानंतर आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी चोरीच्या आरोपातील एका महिलेसह तीन युवकांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे
भाग्यनगर पोलीसांनी काही आरोपींना पकडून चोरीचा लाखोंचा ऐवज जप्त करून तीन युवक, एक महिला यांना अटक केली होती. या संदर्भाने जप्त झालेल्या ऐवजा संदर्भाच्या दोन चोऱ्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घडल्या होत्या. त्या बाबत शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 90/2026 मध्ये 28 एप्रिल रोजी हस्तांतर वॉरंटवर आरोपी अर्जुन पुरुषोत्तम मोरे (28) रा.नंदीगल्ली सोनखेड ह.मु. चौफाळा, प्रदीपकुमार विरेंद्रकुमार कौरी (20) रा.धनेगाव बळीरामपुर नांदेड, आशा हरीषचंद्र तेलंग(56) रा.शाहुनगर नांदेड, सोहेल अब्दुल सत्तार (19) रा.जवाहरनगर नांदेड यांच्याकडे तपास करून त्यांना पुन्हा 30 एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडीत पाठविले होते.
दि.3 मे रोजी शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 444/2025 च्या तपासासाठी न्यायालयातून हस्तांतरण वॉरंट घेतले आणि 4 मे रोजी आरोपींना कारागृहातून पोलीस ठाण्यात आणले. यावेळी सोहेल अब्दुल सत्तार आणि प्रदीपकुमार विरेंद्रकुमार कौरी या दोघांनी गुन्हे शोध पथकाच्या कक्षाच्या खोलीचे दार तोडून, पोलीसांना धक्का देवून पळून गेले. पण पोलीसांनी पाठलाग करून अगोदर प्रदीपकुमार विरेंद्रकुमार कौरीला अटक केली आणि त्यानंतर सोहेल अब्दुल सत्तारला रात्री 3 वाजता अटक केली.
पकडलेल्या महिलेसह तिन्ही युवकांना पोलीस उपनिरिक्षक सय्यद इरफान सय्यद युनूस, पोलीस अंमलदार बालाजी यादगिरवाड, महिला पोलीस अंमलदार हाके यांनी न्यायालयात हजर केले. हा गुन्हा क्रमांक 444/2025 हा गुन्हा 9 डिसेंबर 2025 च्या दुपारी 3.30 ते 12 डिसेंबर 2025 च्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान मंथन नरेश वोरा रा.पंचमुखी हनुमान मंदिराजवळ गणेशनगर येथे घडला होता. त्यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे 91 ग्रॅम वजनाचे, 135 तोळे चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम 20 हजार असा ऐवज चोरून नेला होता. या सर्व ऐवज चोरट्यांकडून जप्त करण्यात आला आहे.  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन युवक आणि एका महिलेला न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.


Post Views: 354






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed