विभागीय मुख्य परिक्षेत नांदेडचे 18 पोलीस अंमलदार झाले पोलीस उपनिरिक्षक

0
IMG-20260505-WA0037.jpg


नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस विभागातील विभागीय पोलीस उपनिरिक्षक पदाची परिक्षा-2023 मुख्य परिक्षेचा निकाल 30 एप्रिल 2026 रोजी आलेला आहे. त्यात एकूण 1957 जणांची नावे आहेत. त्यात नांदेड जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस अंमलदार पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत.
पोलीस विभागात विहित वर्षानंतर पोलीस अंमलदारांना विभागीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देता येते. त्यानुसार या संदर्भाची मुख्य परिक्षा 2023 मध्ये झाली होती. जिचा निकाल 30 एप्रिल 2026 रोजी जाहीर झाला आहे. त्यामध्ये नांदेडच्या 18 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. त्यात दोन पोलीस अंमलदार बाहेर जिल्हयातून नांदेडमध्ये बदलून आले आहेत. त्यामुळे त्यांची नावे कळली नाहीत. नांदेडमधील 16 पोलीस अंमलदार जे पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. आमेर हमीद शरिफ-रॅंक 50(पोलीस ठाणे रामतिर्थ), विक्रम जळबाजी वानखेडे-रॅंक 150(नेमणूक महामार्ग केंद्र देगलूर), राहुल देविदास राठोड-रॅंक 201(नेमणूक पोलीस मुख्यालय), बापू गंगाधरराव भुसावाले रॅंक 226(नेमणुक पोलीस मुख्यालय नांदेड), संजय लिंगुराम च्यापलवार-रॅंक 250(नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा), सुरज सुधाकर कुबडे-रॅंक 348(नेमणुक जलद प्रतिसाद पथक), माधव शिवाजी जुन्ने-रॅंक 323(शहर वाहतुक शाखा), ज्ञानेश्र्वर नामदेव डुकरे-रॅंक 378(नेमणुक पोलीस मुख्यालय नांदेड), सदाशिव अशोकराव बागडे-रॅंक 391(नेमणुक पोलीस मुख्यालय नांदेड), बाळू मच्छिंद्र मरेवाड-रॅंक 403(पोलीस ठाणे मांडवी), संभाजी जीवन केंद्रे-रॅंक 416(शहर वाहतुक शाखा), गणेश दिगंबर जुन्ने-रॅंक 517(नेमणूक पोलीस मुख्यालय), वैभव उत्तमराव मुंडे-रॅंक 521(नेमणूक जलद प्रतिसाद पथक), सतिश गोविंदराव गिते-रॅंक 562(नेमणूक नांदेड ग्रामीण), अश्र्विनी किशन राठोड-रॅंक 584(नेमणुक पोलीस ठाणे हदगाव), शाम केशव सोनटक्के-रॅंक 592(नेमणूक मोटार परिवहन विभाग).
या परिक्षेमध्ये 28 हजार पोलीस अंमलदारांनी परिक्षा दिली होती. त्यातून 7 हजार मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरले. मुख्य परिक्षा 29 डिसेंबर 2023 रोजी पार पडली. त्यातील 2400 पोलीस अंमलदारांना शारिरीक चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. शारिरीक चाचणी 15 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान नवी मुंबई येथे पार पडली. एकूण यादीमधील 615 पोलीस अंमलदारांची निवड झाली आहे. ही निवड पोलीस उपनिरिक्षक पदासाठी झाली आहे. वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा नुतन पोलीस उपनिरिक्षकांना त्यांच्या भविष्यातील जीवनासाठी शुभकामना प्रेषित करीत आहे.


Post Views: 840






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed