जळगाव हादरले!:प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; आरोपीला बेड्या
![]()
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात महिलांवरील अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडिओंच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या घटनेनंतर आता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेम प्रकरणाचा बहाणा करून एका तरुणीला जाळ्यात ओढणाऱ्या यश जैन नावाच्या तरुणाने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 7 लाखांची खंडणी वसूल केली. याप्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याची तांत्रिक तपासणी केली असता, त्यात एकाच नव्हे तर अनेक तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले आहेत. हे प्रकरण केवळ एका तरुणीपुरते मर्यादित नसून आरोपीने अनेक मुलींना अशाच पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय आता बळावला आहे. या खळबळजनक खुलाशानंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल तपास करत आहेत. मोबाईलमध्ये इतरही अनेक मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील तरुणीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी यश महेंद्र जैन याला न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याच्या मोबाईलमध्ये इतरही अनेक मुलींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ आढळल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या संदर्भात माहिती देताना पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी सांगितले की, तपासादरम्यान काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र प्रकरणाचा सखोल तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबतचा अंतिम निष्कर्ष काढता येईल. मोबाईलमधील डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू पोलिसांनी आरोपी यश जैन याला न्यायालयात हजर केले असून, त्याच्या मोबाईलमधील डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी आता वेगाने सुरू आहे. या तांत्रिक विश्लेषणामधून त्याने इतरही काही तरुणींना ब्लॅकमेल केले आहे का, याचा शोध घेतला जात असून, या प्रकरणात नजीकच्या काळात अधिक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संतापजनक ‘व्हिडिओ कांड’मुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस या गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्यासाठी कसून तपास करत आहेत.
