गडचिरोलीत 'नीट' परीक्षेत हायटेक कॉपी:AI च्या मदतीने उत्तरे शोधणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा, शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावरील प्रकार

0
db-temp-cover-marathi-2026-05-05t161236202_1777977800.jpg




देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेत गडचिरोली शहरात हायटेक कॉपीचे रॅकेट उघड झाले आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेत मोबाईल पोलिस एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर सोडवणाऱ्या एका विद्यार्थिनीला पोलिस एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पकडण्यात आले आहे. याप्रप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात ‘सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४’ नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पहिला प्रकार धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर घडला. केंद्र क्र. ३१२५१०२ वर दुपारी ३:४० च्या सुमारास ही घटना घडली. नागभीड (जि. चंद्रपूर) येथील २० वर्षीय विद्यार्थिनी संशयास्पद हालचाली करताना आढळली. पर्यवेक्षक राजेश पाटील पोलिस राखी मुधोळकर यांनी तिची झडती घेतली असता, तिच्याकडे एक मोबाईल सापडला. धक्कादायक म्हणजे, तिने यावर्षीची मूळ प्रश्नपत्रिका आपल्या कपड्यात लपवून ठेवली होती पोलिस जुन्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे मुख्य पान जोडून निरीक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. AI ला प्रश्न पाठवून मागवली उत्तरे दुसरा प्रकार गोकुळनगर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर उघडकीस आला. आष्टी येथील एक १७ वर्षीय विद्यार्थी चक्क मोबाईल घेऊन परीक्षा देत होता. दुपारी अडीचच्या सुमारास पर्यवेक्षक मनीष बानबले यांनी त्याला रंगेहाथ पकडले. परीक्षा संपल्यानंतर त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, गॅलरीमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळून आले. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते एआयला (AI) पाठवले आणि त्याद्वारे प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवल्याचे त्याच्या मोबाईलमधील चॅटिंगवरून स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून तपास सुरू याप्रकरणी केंद्रप्रमुख राजकुमार नंदागवळी आणि अरुण मुनघाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात ‘सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४’ च्या कलम ३ (viii) सह इतर संबंधित कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही चित्रीकरण जप्त केले आहे. या हायटेक कॉपीमागे एखादे मोठे रॅकेट सक्रिय आहे का किंवा त्यांना बाहेरून कोणी मदत करत होते का, याचा पुढील सखोल तपास सहायक पोलिस अधीक्षक हिरडे यांच्याकडून केला जात आहे. सुरक्षा भेदून मोबाईल परीक्षा केंद्रात नेलाच कसा? नीट परीक्षेसाठी देशभरात अत्यंत कडक नियमावली लागू असते. साधी चप्पल, दागिने किंवा केसांच्या पिना घालून जाण्यासही सक्त मनाई असते. अशा कडक तपासणीला बगल देऊन हे दोन्ही विद्यार्थी थेट मोबाईल घेऊन परीक्षा केंद्रात पोहोचलेच कसे, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यामुळे परीक्षा केंद्रावरील सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *