new-project-2026-05-05t150907321_1777973985.jpg



येत्या काही महिन्यांत शिवसेना (शिंदे गट) पक्षात आणि राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीपूर्वी आपल्या मंत्रिमंडळाची ‘भाकरी’ फिरवण्याच्या तयारीत असून, जे मंत्री पक्ष संघटना बळकट करण्यात अपयशी ठरले आह

.

राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत. शिरसाट म्हणाले की, “ऑपरेशन टायगर केव्हा आणि कधी करायचे, याची पूर्ण कल्पना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. ज्या दिवशी गरज भासेल, त्या दिवशी हे ऑपरेशन यशस्वी होईल. आजही उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाकडे आता ती ताकद उरलेली नाही, त्यामुळे हे परिवर्तन अटळ आहे.”

काही निर्णय सांगून होत नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आहे. याबाबत संजय शिरसाट यांना विचारले असता, “दिवाळीपूर्वी खांदेपालट होणार की शिंदे साहेब भाकरी फिरवणार हा निर्णय सांगून होत नाही तर जागेवर होतो. त्यामुळे दिवाळीनंतर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे,” असे म्हणाले.

आमदार महेश शिंदेंवर कारवाईची टांगती तलवार?

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेविरोधात काम केल्याचा आरोप असलेले आमदार महेश शिंदे यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “महेश शिंदे यांची काही विषयांवर नाराजी आहे, हे खरे आहे. दोन दिवसांपूर्वीच माझे त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आपली भूमिका मांडण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, शिंदे साहेब त्यांना वेळ देणार का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.”

पक्षचिन्हावर आमचाच दावा!

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरही शिरसाट यांनी भाष्य केले. “कुणी कुणालाही भेटले तरी आम्हाला फरक पडत नाही. धनुष्यबाण आणि पक्ष आमचाच आहे आणि तो आमच्याकडेच राहील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

हे ही वाचा…

ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात:राजकीय चर्चा, ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणणारी घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. पल्लवी पाटील यांचा नुकताच अपघात झाला असून त्या सध्या उपचार घेत आहेत. ही माहिती मिळताच शिंदे यांनी मंगळवारी थेट मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालय गाठत त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed