शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून आरोपीचा थरारक पळ; एकास पकडण्यात यश, दुसरे दोन फरार

0
IMG-20260504-WA0032.jpg


नांदेड – न्यायालयीन प्रक्रियेसाठी जेलमधून प्रोडक्शन वॉरंटवर आणलेल्या तीन आरोपींपैकी दोघांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून धाडसी पळ काढल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींना पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. त्यांना दुसऱ्या मजल्यावरील डीबी (डिटेक्शन ब्रँच) रूममध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी डीबी इन्चार्ज सय्यद व इतर कर्मचारी यांच्या देखरेखीखाली आरोपी होते. मात्र, संधी साधून तीघांनी अचानक खिडकीतून उड्या मारत पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली. पाठलाग करताना एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र दुसरे दोन आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकारामुळे पोलीस ठाण्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपींनी इतक्या सहजतेने पळ काढल्याने निष्काळजीपणाचा मुद्दा पुढे येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Post Views: 954






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed