कॉर्पोरेट जिहाद:शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध देऊन तरुणाच्याही धर्मांतराचा झाला प्रयत्न; कोठडीत धक्कादायक कबुली
![]()
‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणामध्ये एकामागून एक धक्कादायक प्रकारांची ‘क्रोनोलॉजी’ समोर येत आहे. पीडित हिंदू तरुणाला जाळ्यात ओढून, त्याला शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध देत धर्मांतराचा व बळजबरीने नमाज पठण करायला लावल्याचा संतापजनक प्रकार तपासात उघडकीस आला आहे.
.
या प्रकरणी अटकेतील चारही संशयित ४ मे पर्यंत कोठडीत आहेत. तपासात स्पष्ट झालेल्या व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा कट रचला होता. पीडित तरुणाशी मैत्रीचा बनाव केला. ईदला शिरखुर्मा खाण्यासाठी त्याला बोलावले व त्यातून गुंगीचे औषध दिल्याचा संशय आहे. ते गुंगीचे औषधच हाेते, की अमली पदार्थ हाेते, याचाही तपास केला जात आहे. ते पदार्थ खाल्ल्यानंतर पीडित तरुण शुद्धीत नसताना त्याच्या डोक्यावर टोपी ठेवून बळजबरीने नमाज पठणास भाग पाडले गेले. याशिवाय या गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार जप्त केल्या आहेत. पीडितांला नक्की कोणत्या हॉटेलमध्ये नेले होते व यामागे आणखी कोणते ‘मोठे मासे’ आहेत, याचा शोध सुरू आहे. या प्रकारातील संशयित दानिश शेख याने २०१७ मध्ये कंपनीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या शिफारशीने नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे.
मोबाइल अनलाॅक करण्यात यश, उघडणार डर्टी सिक्रेट
या प्रकारातील संशयित दानिश शेखचा ‘फेस आयडी’ वापरून फाॉरेन्सिक लॅबमध्ये त्याचा मोबाइल अनलाॅक करण्यात आला आहे. या मोबाइलमधून अनेक धक्कादायक चॅट्स, आर्थिक व्यवहार, काही परदेशांमधील आर्थिक व्यवहार आणि पीडित तरुणीला मलेशियात पाठवण्याचे काही संदेश असून एक मोठे रॅकेट उघडकीस आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इनसाइड स्टोरी – फाेटाेद्वारे मानसिक खच्चीकरण, ब्लॅकमेलिंगचाही प्रयत्न
नमाज पठण करतानाचे पीडित तरुणाचे फोटो ऑफिसच्या ग्रुपवर शेअर केले, जेणेकरून त्याचे मानसिक खच्चीकरण करता येईल. संशयितांनी केवळ नशेचाच वापर केला नाही तर पीडित तरुणाला ‘ब्लॅक मॅजिक’ झाल्याचे सांगून भीती दाखवली. “तुझ्यावर संकट आहे’ असे भासवून त्याला धर्मांतराच्या वाटेवर नेण्याचा हा क्रूर प्रयत्न होता, याची आपबितीही पीडिताने तपासात सांगितली आहे.
