लव्ह जिहाद, गोवंश कत्तलीचे अड्डे शोधून त्याची माहिती पोलिसांना द्या:आमदार टी. राजा सिंह यांचे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार संतती नियमन कायदा सर्वांना लागू करण्याची मागणी‎

0
240_177782837269f7821455db3_03hindujamjag.jpg




प्रतिनिधी | अकोला देशात अलीकडे वाढलेले ‘लव्ह जिहाद’, गोवंश तस्करी आणि कत्तलीचे वाढते प्रमाण पाहता त्या विरोधात प्रत्येक हिंदूने आपल्या समाजाच्या रक्षणासाठी आठवड्यातून एक दिवस दोन ते तीन तास कार्य करुन “लव्ह जिहाद’ तसेच गोवंश कत्तलीचे अड्डे शोधून त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन हैदराबाद येथील भाग्यनगरचे आमदार टी. राजा सिंह यांनी केले. हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने येथील एकवीरा मैदानावर रविवारी आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेला संबधित करताना ते बोलत होते. तुमच्या तक्रारी नंतरही पोलिसांनी लव्ह जिहाद आणि गोवंश कत्तलीविरोधात कार्यवाही न केल्यास आपण दुसरा मार्ग अवलंबून पण आधी हिंदूंच्या रक्षणार्थ देशसेवेचे व्रत म्हणून हे कार्य करण्याचा संकल्प करावा, असेही ते म्हणाले. टी. राजा यांनी हिंदू राष्ट्र जागृती सभेला संबधित करताना धर्मावर विश्वास ठेवून धर्माची सेवा करा. महाराष्ट्रातील हिंदू घाबरणारा नाही तर घाबरवणारा व्हावा. जातीवादाच्या नावावर हिंदू समाज आपसात वाटला जात आहे. जेव्हा जेव्हा जिथे जिथे हिंदू समाज विभागला गेला तेथे तेथे त्यांची संख्या कमी होत गेली, हा इतिहास आहे. दुसरीकडे अल्पसंख्याक समाज एकजूट होऊन त्यांची संख्या आणि प्राबल्य वाढवत आहे. याला आळा घालण्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदी यांनी ‘हम दो हमारा एक किंवा दो’ हा संततीनियमाचा कायदा सर्वांसाठी लागू करावा, अशी मागणी आपण त्यांच्याकडे करणार आहोत. उर्वरित पान ४ मनपातील टिपू सुलतान सभागृह पुन्हा चर्चेत देशातील अल्पसंख्याक समाजाच्या मतांच्या आधारे राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांची जागा हिंदू समाजाने दाखवून द्यावी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अल्पसंख्याक समाजासाठी कितीही विकासाच्या, लाभाच्या योजना आणल्या तरी ते भाजपला मत देणार नाहीत, याची जाण त्यांनी ठेवावी, असे सांगून टी. राजा म्हणाले की, राज्यातील आैरंगजेबाची कबर आणि अकोला महापालिकेतील मनपातील स्थायी समिती सभागृहाला दिलेले टिपू सुलतान यांच्या नावाचा फलक त्वरित काढावा आणि त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, असेही ते म्हणाले. त्यामुळे या सभेच्या निमित्ताने मनपातील स्थायी समिती टिपू सुलतान सभागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed