"शिवाजी काेण हाेता'' पुस्तकावर‎बंदीसाठीही करणार आंदोलन‎:हिंदुराष्ट्र जागृती सभा; छत्रपतींच्या भूमीत हिंदूंचा अपमान सहन करणार नाही : घनवट‎

0
240_177782853969f782bb29690_03hindujamjag.jpg




प्रतिनिधी | अकोला हिंदूंच्या भूमीत हिंदूंच्याच सभांना विरोध होणे हे दुर्दैवी आहे. ही भूमी हिंदूंची आहे; हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, त्यामुळे येथे सभा होणारच. जर हिंदूंच्या भूमीत सभा घ्यायची नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन घ्यायची, असा रोखठोक सवाल हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सभेत केला. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला दिलेले टिपू सुलतानचे नाव हटवणे आणि “शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर बंदीसाठी अकोल्यात आंदोलन होणार असल्याची घोषणा सभेत करण्यात आली. जवळपास संपूर्ण मैदान भरले होते. सभेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन झाले. त्यानंतर वंद मंत्रांचे पठण करण्यात आले. सभेसाठी झटणारे िहंदुत्ववादी, अधिवक्ते, समाजमाध्यमांवर सभेचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नमन करण्यात आले. सभेत येणाऱ्या प्रत्येकाला गंध लावण्यात आले. सभास्थळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याठिकाणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, खदानचे ठाणेदार मनोज केदारे, कोतवालीचे ठाणेदार गवई यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस होते. सन ​१९४७ साली धर्माच्या आधारावर फाळणी झाली आणि पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित झाले. त्यामुळे उर्वरित भारत देश ”हिंदू राष्ट्र” घोषित करणे हा आमचा अधिकार आहे, असे सुनील घनवट यांनी ठणकावले. मौलाना साजिद सारखी मंडळी भारत-इराण युद्धात इराणची बाजू घेण्याची भाषा करतात आणि छत्रपतींच्या साम्राज्याला नाकारतात, हे अत्यंत गंभीर आहे. छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना आता हिंदू समाज चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. ​काही राजकीय नेते आणि मंडळींचे शिवप्रेम हा केवळ दिखावा असल्याचे घनवट म्हणाले. राष्ट्रवादी कांँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी छत्रपतींचा अपमान केला तेव्हा हे लोक शांत बसतात. काँग्रेसचे नेते जेव्हा टिपू सुलतानची तुलना छत्रपतींशी करतात तेव्हा मौन पाळतात. पानसरेंच्या “शिवाजी कोण होता’ या पुस्तकाद्वारे छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडला जात असून, या पुस्तकावर बंदी येईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच श्याम मानव यांनी केवळ सवंग लोकप्रियतेसाठी बागेश्वर धाम यांना दिलेले आव्हान आणि नंतर केलेली माघार यावरही त्यांनी टीका केली. ​अकोल्यातील “शिवाजी पेठ’ हे नाव “छत्रपती शिवाजी पेठ’ झालेच पाहिजे. वाशिमचे “वत्सगुल्म’ आणि मंगळूरपीरचे “मंगळूर नाथ’ असे नामकरण करून आपला स्वाभिमान जागृत ठेवला पाहिजे, असे आवाहन सुनील घनवट यांनी केले. नायगाव सारख्या संवेदनशील भागात कोंबिंग ऑपरेशनची गरज त्यांनी व्यक्त केली. हिंदू राष्ट्र द्वेषावर आधारे नव्हे; तर ते सर्वांच्या कल्याणाचे असेल, असे सुनील घनवट म्हणाले. लव्ह जिहादाच्या घटना वाढतच असून, हे प्रकार हिंदूच्या विरोधातील रचलेले षडयंत्र आहे. सर्वधर्म, धर्मनिरपेक्ष हे हिंदूना मुर्ख बनवण्याचा प्रकार आहे, असेही म्हणाले. देशद्रोही प्रवृत्तींना वेळीच ओळखणे गरजेचे ​महाराष्ट्राला “हिरवे’ करण्याची भाषा करणाऱ्यांनी आपला इतिहास तपासावा; अशांची “कब्र’ याच देशात खोदली गेली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. औरंगजेबाच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालणाऱ्या देशद्रोही प्रवृत्तींना वेळीच ओळखणे गरजेचे आहे. सध्या राज्यात “लव्ह जिहाद’सोबतच “कॉर्पोरेट जिहाद’ आणि “एनजीओ जिहाद’चे संकट उभे राहिले आहे. परतवाड्यातील १८० मुलींचे उदाहरण असो वा नागपूर-कोल्हापूरमधील प्रकरणे, आपल्या मुली आता कॉर्पोरेट क्षेत्रातही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. अकोल्याच्या बिंदी घर प्रकरणातून हिंदूंनी बोध घेतला पाहिजे आणि अशा प्रवृत्तींना पाठबळ देणाऱ्यांना भविष्यात मदत करणे थांबवले पाहिजे, असे सुनील घनवट म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed