धार्मिक तेढ, तणाव निर्माण‎झाल्यास प्रशासन जबाबदार‎:"वंचित''चा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

0
240_177782920569f78555cd537_03vanchit.jpg




प्रतिनिधी | अकोला द्वेषपूर्ण धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार टी राजा सिंह यांच्या सभेनंतर धार्मिक तेढ आणि तणाव निर्माण झाला तर याला जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक जबाबदार राहतील असा इशारा वंचित बहुजन आघाडीने रविवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले. तसेच वंचितने पोलिसाांनाही पत्र दिले. पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने वंचितने नियोजन आंदोलन स्थगित केले. वंचितने आमदार टी राजा सिंह यांच्या सभेला विरोध असल्याची भूमिका प्रशासनासमोर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मांडली. पोलिस प्रशासनाकडून माहिती देण्यात आल्याचे वंचितचे म्हणणे आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव नंदकुमार डोगरे, युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, अकोला पूर्व महानगर अध्यक्ष तथा मनपा गटनेते नीलेश देव, पश्चिम महानगर अध्यक्ष मजहर खान, महानगर महासचिव गजानन गवई, तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, नगरसेवक पराग गवई, सुनील इन्नाणी, सचिन शिराळे, विकास सदांशिव, नितीन सपकाळ, सुरेश कलोरे, नागेश उमाळे, सम्राट तायडे ज्योती खिल्लारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed