संगमनेरशहराच्या विकासाचा १०० दिवसांच्या कामांचा लेखाजोखा:महिला सुरक्षा दल ठरले राज्यासाठी मॉडेल; तक्रार निवारण ॲपद्वारे ३१७ प्रश्न मार्गी‎

0
730-x-548-new-2026-05-03t093320457_1777781040.jpg




प्रतिनिधी |संगमनेर नगरपरिषदेच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत नक्की काय बदल झाले? याचा लेखाजोखा सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत मांडला. ‘संगमनेर २.०’ या संकल्पनेतून शहराचा शाश्वत विकास करतानाच, प्रशासकीय मरगळ झटकून ३९ विभागनिहाय बैठकांद्वारे कामांना गती देण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. आमदार तांबे म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेले ‘सुरक्षा रक्षक दल’ हा महाराष्ट्रातील पहिला आणि यशस्वी प्रयोग ठरला आहे. शहराला डिजिटल टच देताना तक्रार निवारण ॲपद्वारे ३१७ तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले. तसेच, उन्हाळ्यातही शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ दिला नाही, हे प्रशासनाचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या भविष्यातील गरजा ओळखून २०२६ चा डीपी प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात सोमेश्वर कॉरिडॉर हा शहराच्या वैभवात भर घालणारा प्रकल्प, २००० हून अधिक कुटुंबांना हक्काचे घर देण्याचे नियोजन. रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी दोन अत्याधुनिक गाड्यांना मंजुरी. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी फ्लेक्समुक्तीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर नियंत्रण मिळवण्यात आले असून, शेतकऱ्यांसाठी हक्काची भाजी मंडी आणि विक्री केंद्रांची जागा निश्चित करण्यात आली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष डॉ. तांबे म्हणाल्या, नागरिकांनी जो विश्वास दाखवला, त्याला पात्र ठरण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या काळात संगमनेरमध्ये दृश्यमान सकारात्मक बदल दिसतील. ठळक घडामोडी : एका नजरेत १०० फूट तिरंगा आणि स्मारके: छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि संविधान भिंतीचे नियोजन. आर्थिक सुधारणा: प्रभावी वसुली मोहिमेमुळे नगरपालिकेची तिजोरी भक्कम झाली. स्वच्छता: १० नवीन ई-टॉयलेट्सची सुविधा आणि कचरा व्यवस्थापनाचे नवे मॉडेल. उद्याने: देखभाल-दुरुस्तीसाठी खासगी संस्थांचे सहकार्य घेणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed