'फुलचंद पानात' नशा करणाऱ्या गोळ्यांचा साठा जप्त:शिवाजीनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली

0
6bf57ce3-de66-46ee-aba1-2fe71c52efaa_1777467626249.jpg




पुणे पोलिसांनी ‘फुलचंद पानात’ नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर मादक गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 3 लाख 38 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस नाईक सचिन जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. शिवाजीनगर येथील दीनदयाळ हॉस्पिटलजवळील एका निर्जन रस्त्यावर एक संशयास्पद टेम्पो उभा असल्याची माहिती होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पथकाने टेम्पोची तपासणी केली असता, त्याच्या मागील दरवाजाच्या आतमध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर मादक गोळ्यांची पाकिटे असलेली पोती आढळून आली. पोलिसांनी तात्काळ हा टेम्पो आणि त्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी विष्णू रामरतन गुप्ता (वय 34, रा. पिंपरी-चिंचवड, पुणे) याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, जप्त केलेल्या या मादक गोळ्यांचा वापर पुण्यातील ‘फुलचंद पानात’ नशा करण्यासाठी केला जात होता. पोलीस या प्रकरणातील पुढील तपास करत असून, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत. ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सपोनि संतोष पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, दीपक रोमाडे आणि श्रीकांत मखरे यांचा या पथकात समावेश होता. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. पान टपरीवर होणाऱ्या अशा बेकायदेशीर कृत्यांवर आता पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed