शरद पवारांनी सर्व पवार कुटुंबाला एकत्र बोलावले:DCM सुनेत्रा पवार यांनाही निमंत्रण; मोदीबागेत जमणार सर्व कुटुंबीय, चर्चेला उधाण
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सर्वच पवार कुटुंबीयांना एकत्र बोलावले आहे. या बैठकीचे निमंत्रण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही देण्यात आले आहे. त्यामुळे पवारांनी बोलावलेल्या या बैठकीविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीच्या दिवशी शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मताधिकार बजावता आला नव्हता. या प्रकरणी त्यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत असताना शरद पवारांनी स्वतः आज सर्वच पवार कुटुंबीयांना बारामती येथील मोदीबाग या आपल्या निवासस्थानी भेटीसाठी बोलावले आहे. या कौटुंबिक भेटीचे निमंत्रण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनाही देण्यात आले आहे. या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण शरद पवार या बैठकीत सर्वांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. शरद पवार आज पुण्यातील त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी आहेत. उद्या ते मुंबईला परत जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी आज सर्व सदस्यांना जेवणासाठी एकत्र बोलावल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे लग्नही ठरले आहे. त्यामुळे या लग्नाचे सर्वांना निमंत्रण देण्यासाठी बोलावले आहे का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुनेत्रा पवार येणार की नाही? दुसरीकडे, शरद पवारांच्या निकटवर्तीयांनी ही भेट पूर्णतः कौटुंबिक असल्याचा दावा करत त्यात कोणतीही राजकीय चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट् केले आहे. या बैठकीला सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळेंसह जय पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार यांच्यासह कुटुंबातील ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात नाहीत अशा सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण ऐनवेळी या बैठकीला कोण-कोण हजर राहणार? हे पाहावे लागणार आहे. कारण, सुनेत्रा पवार सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे त्या या भेटीला हजर राहणार की? याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा… छत्रपती शिवरायांविषयी निरर्थक वाद सुरू:’शिवाजी कोण होता?’ वर आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचले की नाही मला माहिती नाही – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा असल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या निरर्थक वाद सुरू आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही. शिवाजी कोण होता? हे पुस्तक 1979 साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक व असंवदेनशील कृत्य आहे, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
