आयआयबीयन्स जेईई मेन्स निकालात ‘रायजिंग स्टार’!

0
IMG-20260129-WA0010

जेईई निकालातील यश हे विद्यार्थी व पालकांच्या विश्वासाचे फलित –टीम आयआयबी

जेईई मेन ही देशातील प्रमुख अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा असून ती राष्ट्रीय परीक्षा संस्था मार्फत घेतली जाते. या परीक्षेद्वारे एनआयटी, ट्रिपल आयटी व इतर नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांवर आधारित ही सीबीटी (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षा असते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स देण्याची संधी मिळते.

या निकालात कुमारी अंजली रविशंकर — ९९.५९८, अग्रवाल कृष्णा राजेश — ९९.५७७, बारगळ आयुष गणेश — ९९.५७६, कदम आनंद गंगाधर — ९९.२१९, करेवाड मंगेश यादव — ९९.०२८ तर इतर ३० विद्यार्थ्यांनी ९८ पेक्षा अधिक, ८४ विद्यार्थ्यांनी ९४ पेक्षा अधिक आणि एकूण १२५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.

जेईईसाठी आयआयबीने आयआयटी, एनआयटी प्रशिक्षित अत्यंत तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांची टीम तयार केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिकवणीसह भरपूर सराव परीक्षा, अद्ययावत नोट्स, स्पेशल डाऊट क्लासेस इत्यादी सुविधांचा लाभ मिळत आहे. नीटप्रमाणे जेईई आणि सीईटीमध्येही सर्वोत्तम निकाल देण्यासाठी टीम आयआयबी अहोरात्र मेहनत घेत असल्याचे मुख्य कार्यकारी संचालक श्री. दशरथ पाटील यांनी सांगितले.

आयआयटी-जेईई, जेईई मेन्स तसेच सीईटी या सर्व परीक्षा संगणकाधारित असल्यामुळे त्यांच्या सरावासाठी आयआयबी कॅम्पसमध्ये अद्ययावत संगणक कक्ष (कॉम्प्युटर लॅब) उभारण्यात आला आहे. तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन, अभ्यासातील सातत्य आणि काटेकोर नियोजन यामुळे उत्कृष्ट निकाल मिळतो. वाढती स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांसह पालकांची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे.

विद्यार्थ्यांचा फीडबॅक आणि पालकांकडून मिळालेल्या सूचनांची अंमलबजावणी हा आयआयबीचा पॅटर्न असून येणाऱ्या काळात मोठ्या संख्येने विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरावेत यासाठी टीम आयआयबी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या निकालामुळे आयआयबी टीमसह विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून अॅडव्हान्ससाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीजची सुरुवात करण्यात आली आहे. गुणवत्ता आणि गुणवत्तेतील सातत्य अशी ओळख असलेल्या आयआयबीने जेईईमध्ये केलेली ही सुरुवात सार्थ ठरल्याचे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed