परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती:15 मुलींचे शोषण करणाऱ्या शाहिदला बेड्या, तरुणींचे व्हिडिओ बनवून मित्रांना केले शेअर

0
new-project-2026-04-28t134201132_1777363955.jpg




नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात आणि अमरावती-परतवाडा येथील ‘अयान’ प्रकरणाने संपूर्ण राज्याची झोप उडवलेली असतानाच, आता कोल्हापूर जिल्ह्यातूनही एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे याने तब्बल 15 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करत व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शाहिद सनदे हा सोशल मीडिया आणि इंटरनेटवरील प्रोफाईलचा वापर करून मुलींशी संपर्क साधायचा. मैत्रीचे रूपांतर प्रेमात करून तो मुलींचा विश्वास संपादन करत असे. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवून त्यांचे चोरून व्हिडिओ आणि फोटो काढायचा. हे खाजगी क्षणांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडित मुलींना ब्लॅकमेल करायचा आणि त्यांच्यावर वारंवार अत्याचार करायचा. एका पीडितेने दिली तक्रार प्राथमिक माहितीनुसार, शाहिदने आतापर्यंत 15 हून अधिक तरुणींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपीने हे व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील एका पीडित तरुणीने धैर्याने पुढे येत राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. 4 दिवसांची पोलिस कोठडी राजारामपुरी पोलिसांनी संशयित शाहिद सनदेला ताब्यात घेऊन हातकणंगले पोलिसांच्या स्वाधीन केले. हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी आरोपीला पेठवडगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. व्हिडिओला मदत करणारा मित्र फरार व्हिडिओ तयार करण्यात मदत करणारा शाहिदचा एक मित्र सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्याकडे इतर अनेक तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी पुलाची शिरोली गाव आज कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed