‘हिंदुराष्ट्र जागृती सभे’च्या मैदानाचे भूमिपूजन:३ मे रोजी गुंजणार शंखनाद

0
240_177721590169ee299d34a55_26hindujanjag.jpg




प्रतिनिधी | अकोला गोरक्षण रोडवरील श्री एकवीरा मैदानावर ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या हिंदुराष्ट्र जागृती सभेच्या पूर्वसिद्धतेचा प्रारंभ मैदानावर भूमिपूजन करून करण्यात आला. ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हिंदुराष्ट्र’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. सभेला तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबतच सनातन संस्थेच्या सदगुरू स्वाती खाडे आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांची ओजस्वी वाणी अकोलेकरांना लाभणार आहे. सामान्य हिंदू, हिंदू संघटना आणि विविध संप्रदायांना संघटित करणे, हा या हिंदुराष्ट्र-जागृती सभेचा मुख्य उद्देश आहे. हिंदू आणि हिंदु धर्म आणि संस्कृतीवर होणारे आघात रोखण्यासाठी समाजात व्यापक जागृती निर्माण करण्याचे कार्य या सभेच्या माध्यमातून केले जात आहे. यावेळी अशोक पात्रीकर उपस्थित होते. भूमिपूजन सुरेश काबरा यांच्या हस्ते संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed